हृतिक रोशनवर जीवापाड प्रेम करायची सुजैन खान, म्हणाली होती-त्याच्याशिवाय आयुष्यात.....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 01:47 PM2023-07-14T13:47:15+5:302023-07-14T13:50:10+5:30

हृतिक आणि सुझान यांचा सुरु असलेला सुखी संसारात नेमके कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे आजपर्यंत कोणालाच कळाले नाही. लग्नाच्या १३ वर्षानंतर परस्पर संमतीने कायदेशीररित्या दोघांनी घटस्फोट घेतला.

Hrithik roshan relation before divorce with ex wife sussanne khan used to say i cant live without you | हृतिक रोशनवर जीवापाड प्रेम करायची सुजैन खान, म्हणाली होती-त्याच्याशिवाय आयुष्यात.....

हृतिक रोशनवर जीवापाड प्रेम करायची सुजैन खान, म्हणाली होती-त्याच्याशिवाय आयुष्यात.....

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांची लव्हस्टोरी तुफान गाजली. यातलीच एक जोडी म्हणजे अभिनेता हृतिक रोशन (hrithik roshan) आणि सुजैन खान (Sussane Khan). 2000 साली लग्नगाठ बांधलेल्या या जोडीने १३ वर्षानंतर परस्पर संमतीने कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. मात्र, आजही त्यांच्या प्रेमाची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगते. सिनेमाला शोधले अशी त्यांची लव्हस्टोरी होती. 

एक जुना व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये सुजैन खान हृतिकवर तिचं असलेले प्रेम व्यक्त करताना यात दिसली होती. त्या व्हिडीओत सुजैन खान म्हणाली होती, मी कल्पनाही करू शकत नाही की मी हृतिकशिवाय आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकेन. मी हृतिकशिवाय माझ्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही, मी त्याच्याशी खूप जोडले गेलेले आहे. 

करण जोहरच्या कॉफी विथ करणमधील बसून सुजैनचा हा व्हिडीओ आहे.  2005 मध्ये कॉफी विथ करणचा हा सीझन होता ज्यामध्ये सुझैनने तिचं ह्रतिकवर किती प्रेम आहे हे सांगितलं होते. या एपिसोडमध्ये शाहरुख खानची पत्नी गौरी खान सुझानच्या शेजारी बसली होती. घटस्फोटानंतर ह्रतिक आणि सुजैन दोघेही आपआपल्या आयुष्यात पुढे निघून गेले आहेत.

एका मुलाखतीमध्ये हृतिकने सुजैनसोबतच्या पहिल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला होता. आमची पहिली भेट एका सिग्नलवर झाली होती. आम्ही दोघंही आपआपल्या गाडीत होतो आणि ट्रॅफिक जाम झालं होतं. सुजैनची कार माझ्या कारजवळच उभी होती. त्यावेळी माझी नजर तिच्यावर पडली आणि त्याचवेळी मी तिच्या प्रेमात पडलो. त्यानंतर आम्ही दोघंही एका लग्नात भेटलो. त्यानंतर एक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर आपण लग्न करावं असा विचार हृतिकच्या मनात आला आणि त्याने सुजैनला लग्नाची मागणी घातली. विशेष म्हणजे या प्रपोजनंतर जवळपास ४ वर्ष त्यांनी एकमेकांना डेट केलं त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला."
 

Web Title: Hrithik roshan relation before divorce with ex wife sussanne khan used to say i cant live without you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.