बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन (hrithik roshan) तिच्या चित्रपटांसोबतच फिटनेस आणि स्मार्टनेसमुळे चर्चेत असतो. बऱ्याचदा हृतिक सोशल मीडियावर त्याच्या वर्कआऊटचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करत असतो. यावरुन ती किती फिटनेस फ्रिक आहे याचा अंदाज येतो. विशेष म्हणजे केवळ हृतिकच नव्हे तर त्याची आई आणि वडील हेदेखील फिटनेसच्या बाबतीत चांगलेच सजग आहेत. सध्या सोशल मीडियावर हृतिकचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता, निर्माता राकेश रोशन यांचा वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हृतिक बऱ्याचदा त्याच्या आईसोबतचे काही जीममधील व्हिडीओ शेअर करत असतो. त्याची आईदेखील फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागृक असल्याचं दिसून येतं. मात्र, यावेळी राकेश रोशन (rakesh roshan) यांचा व्हिडीओ पाहून त्यांच्यासमोर हृतिकही फेल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हृतिकने स्वत:च्या त्याच्या वडिलांचा हेवी वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या वयात राकेश रोशन वयाच्या ७२ व्या वर्षीही पूर्ण उत्साहात वर्कआऊट करत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या तासाभरात हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, वर्ल्ड बेस्ट डॅड असं एका युजरने म्हटलं आहे. तर, कधी हार मानू नका सर असं अन्य एका दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं आहे. यामध्येच सुजैन खाननेदेखील कमेंट केली आहे.