हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५३.३५ कोटींची कमाई करत अनेक विक्रम मोडीत काढले. आत्तापर्यंत या चित्रपटाने 77.70 कोटींची कमाई केली आहे. अर्थात पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुस-या दिवसाच्या कमाईत थोडी घट दिसली. दुस-या दिवशी चित्रपटाने 23.10 कोटींचा बिझनेस केला. एकाचवेळी हिंदी, तमिळ आणि तेलुगू अशा तीन भाषांमध्ये ‘वॉर’ प्रदर्शित झाला. यापैकी हिंदी भाषेतील हा सिनेमा देशभरातील 3800 स्क्रिन्सवर रिलीज झाला. एकट्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी ५१.६० कोटींचा गल्ला जमवला. तमिळ आणि तेलुगू व्हर्जनने १.७५ कोटी इतकी कमाई केली.
War Movie Box Office Collection : ‘वॉर’ची विक्रमी कमाई, दोन दिवसांत कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 16:07 IST
War Movie Box Office Collection Day 2 : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा ‘वॉर’ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.
War Movie Box Office Collection : ‘वॉर’ची विक्रमी कमाई, दोन दिवसांत कमावले इतके कोटी
ठळक मुद्दे२०१९ मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांचा विचार केल्यास त्यातही ‘वॉर’ ने बाजी मारली आहे.