ऑनलाइन लोकमत
अंकारा, दि. २९ - इस्तंबुल विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट होण्याच्या काही तास आधी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या दोन मुलांसोबत विमातळावर उपस्थित होता. स्वत: हृतिकने टि्वट करुन ही माहिती दिली आहे. हृतिक आणि त्याच्या मुलांचे इस्तंबुलहून एक कनेक्टींग फ्लाईट चुकले.
त्यांना बिझनेस क्लासचे तिकीट हवे होते पण ते न मिळाल्याने त्यांना विमानतळावरच थांबून रहावे लागले. त्यानंतर हृतिकने विमानतळावरील कर्मचा-यांच्या मदतीने दुस-या विमानाचे बुकिंग केले व दुस-या ठिकाणी निघून गेला.
आणखी वाचा
ऐनवेळी विमान तिकीटाच्या बुकिंगसाठी केलेल्या मदतीबद्दल हृतिकने विमानतळावरील कर्मचा-यांचे कौतुक केले आहे. धर्मासाठी निरपराधांचा बळी घेतला आपण दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र राहून लढले पाहिजे असे हृतिकने टि्वटमध्ये म्हटले आहे. इस्तंबुल विमानतळावर आत्मघातकी दहशतवाद्यांनी दोन बॉम्बस्फोट घडवले. यात ३६ नागरीकांचा बळी गेला तर, शंभरपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले.