Join us

हृता दुर्गुळेनं सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, म्हणाली - 'सिनेमातील कलाकार...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 2:31 PM

बस बाई बस (Bas Bai Bas) कार्यक्रमात या आठवड्यात महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवरील बस बाई बस (Bas Bai Bas) मालिका अल्पावधतीच लोकप्रिय झाली. या कार्यक्रमाची दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. महिला राजकारण्यांनंतर बस बाई बसच्या मंचावर एकाहून एक सरस अभिनेत्रींनी हजेरी लावलीय. मागील आठवड्यात अभिनेत्री क्रांती रेडकरने हजेरी लावली होती. तर या आठवड्यात महाराष्ट्राची क्रश अर्थात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) पाहायला मिळणार आहे. या आठवड्याच्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. यात हृता सुबोध भावेच्या प्रश्नांची दमदार उत्तर देताना तिने सिनेमा आणि मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांविषयी खूप महत्त्वाचे विधान केले आहे.

बस बाई बसच्या मंचावर सुबोध भावे त्याच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या सेगमेंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्याच्या पद्धतीने बोलत करण्याचा प्रयत्न करत असतो. कार्यक्रमात एक गेम खेळला जातो ज्यात विचारलेल्या प्रश्नांची होय किंवा नाही अशी उत्तर द्यायची असतात. या सेगमेंटमध्ये सुबोधने हृताला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी सुबोधने हृताला विचारले की, सिनेमात काम करणारे कलाकार मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना कमी लेखतात का?  त्यावर हृताने लगेचच या प्रश्नाचं 'होय' असे उत्तर दिले. तिच्या उत्तरानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

हृताच्या होय अशा उत्तरानंतर सुबोधनं तिला 'कोण आहेत असे? मला सांग जरा?', त्यावर हृताने 'नाही नाही', असे उत्तर दिले. हृता म्हणाली, 'मी त्यांची नावे नाही सांगणार पण हे एविडेंट आहे. सेटवर त्यांच्या वागण्या बोलण्यावरुन त्यांच्या वाइब्सवरुन समजते'.

पुढे सुबोधने हृताला विचारलं की, 'म्हणजे ते कलाकार मोठ्या पडद्यावर दिसतात म्हणून ते स्वत:ला भारी समजतात आणि तुम्ही छोट्या पडद्यावर दिसता म्हणून तुम्हाला कमी लेखतात?', यावर हृता म्हणाली, 'मला खरे माहित नाही पण एक गोष्ट हे की टेलिव्हिजन कलाकार फार प्रसिद्ध असतात. कारण ते दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचतात'.बस बाई बसमध्ये हृता दुर्गुळेने केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा एपिसोड येत्या शुक्रवार आणि शनिवारी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

टॅग्स :ऋता दूर्गुळेसुबोध भावे झी मराठी