चाहत्याने दिलेली भेट पाहून हृता झाली थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 08:00 PM2019-05-03T20:00:00+5:302019-05-03T20:00:00+5:30

'झी युवा'वाहिनीवरील निरनिराळ्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना चाहत्यांचे हे प्रेम अगदी भरभरून मिळते आहे.

Hruta Durgule was so happy when her fan gifted this | चाहत्याने दिलेली भेट पाहून हृता झाली थक्क!

चाहत्याने दिलेली भेट पाहून हृता झाली थक्क!

googlenewsNext
ठळक मुद्देहृता दुर्गुळेला तिच्या एका चाहत्याने एक गिफ्ट दिले आहेया चाहत्याची मी फार फार आभारी आहे- हृता दुर्गुळे

'झी युवा'वाहिनीवरील निरनिराळ्या मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांना चाहत्यांचे हे प्रेम अगदी भरभरून मिळते आहे. विशेषतः नुकतीच दोन वर्षे पूर्ण करणारी 'फुलपाखरू' ही मालिका याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. मालिकेबरोबरच मालिकेतील मुख्य जोडी, मानस आणि वैदेही यांचा एक वेगळा चाहतावर्ग तयार झाला आहे.

सोशल मीडियावरील अनेक पेजेसच्या माध्यमातून प्रेक्षकांचे या जोडीवर असलेले प्रेम वेळोवेळी दिसून येते. हृता दुर्गुळेला तिच्या एका चाहत्याने, तिची एक छानसे पेटिंग गिफ्ट म्हणून दिले आहे. उमेश पांचाळ या चित्रकाराने हृताचे हे हुबेहूब चित्र काढले आहे. 

कलाकारांची ओळख, मालिकेतील पात्राच्या नावाने होऊन जाणे अशा घटना सुद्धा घडत असतात. पण, चाहत्यांनी कलाकारावरील आपलं प्रेम, आपुलकी याप्रकारे दाखवणे ही त्यांच्यासाठी कामाची मोठी पोचपावती ठरतात.

हृता याचाच अनुभव सध्या घेत आहे. अशा अनुभवांविषयी व चाहत्यांविषयी बोलताना हृता दुर्गुळे म्हणते; "फुलपाखरू मालिकेमुळे माझी ओळख 'वैदेही' अशीच होऊन गेली आहे. चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव आम्हा कलाकारांवर नेहमीच होत असतो. रोजच एखादा छानसा अनुभव मिळत असतो. पण, हा अनुभव नक्कीच अविस्मरणीय आहे. या चाहत्याची मी फार फार आभारी आहे. माझ्यासाठी ही भेट खूपच महत्त्वाची ठरली आहे. वैदेहीचा सोशल मीडियावर असलेला चाहतावर्ग नेहमीच शुभेच्छा देत असतो; मात्र अशा एखाद्या मन जिंकणाऱ्या भेटवस्तूमुळे मिळणाऱ्या शुभेच्छा नक्कीच जास्त आपुलकीच्या वाटतात. चाहत्यांचे असलेले प्रेम असेच कायम राहू देत हीच अपेक्षा आहे."

Web Title: Hruta Durgule was so happy when her fan gifted this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.