गझनी फेम अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा गेल्या मंगळवारी (दि.१९) दिल्लीतील एका प्रसिद्ध लक्झरी हॉटेलमध्ये विवाह सोहळा धूमधडक्यात पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून असिन आणि राहुल एकमेकांना डेट करत होते. या लग्नाने बॉलीवूडच्या नायिकांचे उद्योजकप्रेम पुन्हा एकदा चर्चेत आले. यापूर्वीदेखील अनेक अभिनेत्रींनी अगदी ठरवून बिझनेस मॅन पती निवडला आहे. अशा लग्नांवर एक नजर....टीना मुनीम-अनिल अंबानीढोबळ मानाने विचार केला, तर अशा लग्नांची सुरुवात टीना मुनीम-अनिल अंबानी यांच्या लग्नाने झाली. टीना मुनीम यांनी संजय दत्त स्टारर फिल्म ‘रॉकी’मधून (१९८१) बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगलीच मैत्री जमली. मात्र, त्यांच्यातील हे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर टीनाचे नाव राजेश खन्ना यांच्याशी जोडले गेले, परंतु १९८७ मध्ये त्यांच्यातीलही नाते संपुष्टात आले. पुढे पाच वर्षांनंतर १९९२ मध्ये उद्योगपती अनिल अंबानी यांच्याशी टिनाचे लव्हमॅरेज झाले. टीना आणि अनिल यांना दोन मुले असून, हे लग्न यशस्वी ठरले आहे.इशा देओल-भरत तख्तानीधर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी इशा देओल हिने ‘कोई मेरे दिल से पुछे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र, तिचे फिल्मी करिअर फार काळ टिकले नही. तिने २०१२ मध्ये मुंबई येथील प्रसिद्ध बिझनेस मॅन भारत तख्तानी यांच्याशी लग्न करून संसार थाटला. जुही चावला-जय मेहता१९८४ मध्ये मिस इंडियाचा किताब पटाकवलेल्या जुही चावला हिने बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९९७ मध्ये तिने भारतीय वंशाचे ब्रिटिश बिझनेस मॅन जय मेहता यांच्याशी लग्नाची घोषणा करून तिने सगळ्यांनाच धक्का दिला. जुहीच्या लग्नाच्या बातम्या समोर आल्या, तेव्हा ती आई बनणार होती. जय आणि जुहीला मुलगा व मुलगी आहे.शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा१९९३ मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटाद्वारे शिल्पा शेट्टी चंदेरी दुनियेत आली. तिचे नाव सुरुवातील अक्षय कुमारशी जोडले गेले. अक्षयशी ब्रेकअप झाल्यानंतर ती बरीच वर्षे सिंगल होती. २००७ मध्ये रिअॅलिटी शो बिग ब्रदरचा किताब जिंकल्यानंतर तिची भेट बिझनेस मॅन राज कुंद्रा याच्याशी झाली. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर नोव्हेंबर २००९ मध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले. रवीना टंडन-अनिल थडानी‘स्टंप्ड’ (२००३) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीना टंडन हिने फिल्म डिस्ट्रिब्यूटर अनिल थडानी याच्याशी डेटिंग करण्यास सुरुवात केली. अनिल याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतलेला असल्याने दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, तसेच त्याच वर्षी दोघांनी साखरपुडाही उरकून घेतला. पुढे २२ फेब्रुवारी २००४ मध्ये राजस्थान, उदयपूर येथील जग मंदिर पॅलेस येथे दोघांनी विवाह केला. रवीना आणि अनिलला राशा नावाची मुलगी व रणबीर नावाचा मुलगा आहे. दीया मिर्जा-साहिल संघाअभिनेत्री दीया मिर्जा आणि साहिल संघा यांच्यातील लॉँग टाइम चाललेल्या लव्ह स्टोरीचे २०१४ मध्ये लग्नात रूपांतर झाले. साहिल संघा यांना बॉलीवूडमध्ये डायरेक्टर आणि को-प्रोड्युसर म्हणून ओळखले जाते. साहिल यांनी ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. दीया आणि साहिल यांचा ‘बॉर्न फ्री एंटरटेन्मेंट प्रोडक्शन हाउस’देखील आहे.
पती हवा बिझनेस मॅन!
By admin | Published: January 25, 2016 1:12 AM