‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ बॉक्सआॅफिसवर इतका दणकून आपटेल, असे दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली आणि चित्रपटगृहांतून तो उतरला. समीक्षकांनी या चित्रपटाला क्लिष्ट, बोजड ठरवले. प्रेक्षकांनाही हा चित्रपट रूचला नाही. आपल्या चित्रपटाची अशी गत झालेली पाहून तिग्मांशू धूलिया निराश झाले आहेत. केवळ निराशचं नाही तर ते डिप्रेशनमध्ये गेले आहेत.स्पॉटब्वॉयला दिलेल्या मुलाखतीत, खुद्द तिग्मांशू धूलिया यांनी स्वत:चं आपलीही ही निराशा बोलून दाखवली. एक चित्रपट बनवणे कुण्या एकाचे काम नसते. त्यामागे अनेक लोकांची मेहनत असते. कॅमेरामॅन, एडिटर, साऊंड रेकॉर्डिस्ट असे अनेक लोक पहिल्या दिवसापासून चित्रपटाशी जुळलेले असतात. आम्ही एक चांगला चित्रपट बनवला, असे आम्हा सगळ्यांनाचं वाटत होते. पण चित्रपट असा फ्लॉप झालेला पाहून मला प्रचंड दु:ख होतेय. मी डिप्रेशनमध्ये आहे. चित्रपट फ्लॉप होण्याची सगळी जबाबदारी माझी एकट्याची आहे. या चित्रपटाने मला एक धडा शिकवला. मी यानंतर तो लक्षात ठेवेन, असे तिग्मांशू धूलिया म्हणाले.‘साहेब, बीवी और गँगस्टर3’मध्ये संजय दत्त, जिमी शेरगिल, चित्रांगदा सिंह, माही गिल मुख्य भूमिकेत आहेत. ‘संजू’ या बायोपिकनंतर संजयचा रिलीज होणारा हा पहिला चित्रपट होता. त्यामुळे ‘साहेब, बीवी और गँगस्टर3’कडून मेकर्सला बऱ्याच अपेक्षा होत्या. या चित्रपटाच्या पहिले दोन पार्ट हिट होते. त्यामुळे तिसरा पार्टही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले, अशी आशा होती. पण प्रत्यक्षात हा चित्रपट आपली लागतही काढू शकला नाही. या चित्रपटाचा एकूण बजेट २५ कोटी होता. पण पहिल्या आठवड्यात या सिनेमाने केवळ ७.५ कोटी कमावले.
‘साहेब, बीवी और गँगस्टर3’ फ्लॉप! दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया डिप्रेशनमध्ये!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2018 12:07 PM