Join us  

कोणतेही आरोप करायला मी सलमान नाही - राखी सावंत

By admin | Published: April 04, 2017 11:30 AM

राखी सावंतने सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच सलमान खानचा दाखला देत तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 3 - आयटम गर्ल राखी सावंत सध्या भगवान वाल्मिकी आणि त्यांची साधना करणाऱ्या काही भक्तांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चर्चेत आहे. तिच्या विरोधात अटक वारंट जारी करण्यात आले असून अटक करण्यासाठी पंजाब पोलीस लुधियानाहून मुंबईसाठी रवाना झाले आहेत. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतने सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच सलमान खानचा दाखला देत तिने स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राखी म्हणाली की, मी सलमान खान नाही. मी राखी सावंत आहे. माझ्यावर आरोप करुन काहीही मिळणार नाही. मी साधी मुलगी असून, समाज कार्यासोबतच मी चित्रपटामध्ये काम करते. राखी विरोधात तक्रार दाखल करणा-या अ‍ॅडव्होकेट नारिंदर आदिया यांनी म्हटले की, "आरोपी कितीही शक्तिशाली असला तरी, न्यायालयापासून स्वत:च बचाव करू शकणार नाही". आदिया यांना विश्वास आहे की, पोलीस राखीला न्यायालयात हजर करतील, तर वरिष्ठ वकील मलविंदर सिंह घुम्मन यांनी म्हटले की, "कायदा सगळ्यांसाठी समान असून, पोलीस त्यांचे काम करीत आहेत". या प्रकरणातील पुढील सुनावणी 10 एप्रिलला होणार आहे.
काय आहे प्रकरण -
गेल्या वर्षी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीने वाल्मिकी समाजाला अनुसरुन भगवान वाल्मिकींचा उल्लेख मारेकरी म्हणून केला होता. तेव्हापासून राखीवर वाल्मिकी समाजाचा रोष ओढावला आहे. या घटनेनंतर राखीला न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठवूनही तिने न्यायालयात हजर न राहता न्यायव्यवस्थेचा एक प्रकारे अपमानच केला आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण आता तिच्या अंगलगट येताना दिसत आहे. 9 मार्च रोजी न्यायालयाने राखी सावंतला हजर राहण्याचा आदेश देऊनही हजर न राहिल्याने अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.