'सुशांतच्या विचाराने मला झोप नाही लागत', अध्ययन सुमनने व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 12:20 PM2020-09-07T12:20:32+5:302020-09-07T12:21:06+5:30
सुशांतच्या आत्महत्येला आता दोन पेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत. यावर आता अभिनेता अध्ययन सुमन याने प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आम्हत्येचा तपास सध्या सीबीआयकडून सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्येला आता दोन पेक्षा जास्त महिने उलटून गेले आहेत. यावर आता अभिनेता अध्ययन सुमन याने प्रतिक्रिया दिली आहे.
सुशांतबद्दल अध्ययन म्हणाला की, सुशांत माझा मित्र नव्हता. तसेच मी त्याला ओळखतंही नव्हतो. मात्र तरीही सुशांतचा विचार माझ्या मनात आला की अस्वस्थ होतो. त्याच्या सततच्या विचारांमुळे मला झोपही लागत नाही आहे.
सुशांतचा मृत्यू ही फार दुर्देवी घटना आहे. त्याच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला फार धक्का बसला. मी त्याला कधी भेटलो नव्हते. मात्र त्याचे सिनेमे मी पाहिले आहेत. तो एक चांगला अभिनेता होता, असे अध्ययन म्हणाला.
दरम्यान एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली. त्याचबरोबर सॅम्यूअल मिरांडा यालादेखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही न्यायालयाने 9 सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. आता NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावलं होतं. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यावेळी ती अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. रविवारी अंमली पदार्थ विरोधी पथकाने रियाची चौकशी केली.