Join us  

‘भूमिकांमुळे मी माणसे जोडली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2017 5:54 AM

निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अशा अनेक भूमिकांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर. भाषेवर प्रभुत्व, देहबोली, उत्कृष्ट संवाद ही त्याच्या

- Aboli Kulkarniनिर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता अशा अनेक भूमिकांमध्ये लीलया वावरणारा कलाकार म्हणजे चिन्मय मांडलेकर. भाषेवर प्रभुत्व, देहबोली, उत्कृष्ट संवाद ही त्याच्या अभिनयाची वैशिष्ट्ये. अनेक चित्रपटांमध्ये त्याने उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. अनेक मालिकांमधून त्याने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. सध्या तो तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित एका मालिके मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसतो आहे. यानिमित्त त्याच्याशी केलेली ही हितगुज...४प्रश्न : आत्तापर्यंतच्या प्रवासात तुझी बेस्ट कॉम्प्लिमेंट कोणती? - ‘तू आम्हाला आमच्यातलाच वाटतोस’ ही कॉम्प्लिमेंट मला अनेकांकडून मिळालीय. प्रत्येक वयोगटातील लोक जी मला भेटली, त्यांनी माझ्याजवळ हीच प्रतिक्रिया नोंदवली. जसं आपण सलमान खान किंवा शाहरुख खान यांना पाहतो ते कधीच आपल्याला जवळचे वाटत नाहीत, तसं माझ्याबाबतीत होत नाहीये याचा मला आनंद आहे.४प्रश्न : टीव्ही आणि चित्रपट यांपैकी कुठल्या ठिकाणी तू स्वत:ला जास्त कम्फर्टेबल मानतोस?- खरंतर दोन्ही माध्यमं मला मनापासून आवडतात. फक्त टीव्ही मालिका करताना खूप हेक्टिक शेड्यूल असतं. तसं चित्रपटाच्या बाबतीत होत नाही. मालिकेच्या सेटवर कलाकार तुमचे फॅमिली मेंबर होतात. त्यांच्यासोबत तुमचे शेअरिंग सुरू होते. चित्रपट करत असताना तुमचे कलाकारांसोबत एका विशिष्ट कालावधीपर्यंत नाते जोडले जाते. पण, मी दोन्ही ठिकाणी एन्जॉय करतो.४प्रश्न : तुकाराम या भूमिकेत असताना तुझ्या स्मरणात राहिलेला क्षण किंवा अनुभव कुठला?- तुकाराम या भूमिकेने मला दिलेले अनुभव अनेक आहेत. अनेक गोष्टी, किस्से, घटना घडल्या. तुकारामांवर श्रद्धा असणारे लोक हे प्रत्येक वर्गातले आहेत. कधीकधी लोक येऊन माझ्या पायादेखील पडतात. पण, साहजिकच या सर्व गोष्टींचा एक कलाकार म्हणून अतिरेकही वाटतो.४प्रश्न: लेखक, अभिनेता, दिग्दर्शक म्हणून तू आत्तापर्यंत काम पाहिलं आहेस. पण तुला कोणत्या प्रकारांत काम करायला जास्त आवडतं?- मला तिन्ही प्रकारच्या भूमिकांमध्ये काम करायला आवडतं. तुम्ही जेव्हा अभिनेता असता तेव्हा तुम्हाला दुसरं काहीच टेन्शन नसतं. तुम्ही जेव्हा लेखक असता तेव्हा आरामात टीव्ही पाहतही लिहू शकता आणि जेव्हा तुम्ही दिग्दर्शक असता तेव्हा तुम्हाला मालिकेचे भाग, शो यांच्यावरच लक्ष ठेवावं लागतं. ४प्रश्न: तू तुझ्या बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी कसा वेळ काढतोस?- खरंतर दिवसभर शूटिंग करून दमायला होतं, पण माझ्या भूमिकेत मी एवढा रमलो आहे की, माझ्यावर त्या स्ट्रेसचाही काही परिणाम होत नाही. पण, होय मी स्वत:साठी वेळ काढतो. मला आवडतात त्या सर्व गोष्टी करतो. ४प्रश्न : स्क्रिप्ट निवडताना तू कोणत्या गोष्टींची काळजी घेतोस?- ती गोष्ट नेमकं काय सांगतेय? आणि दुसरं म्हणजे त्यात माझी भूमिका कशी आहे? कधी कधी काय होतं की, चांगल्या मालिकांचे प्रस्ताव येतात; पण त्यात तुमची भूमिका तेवढ्या ताकदीची नसते. म्हणून स्क्रिप्टसोबतच मी भूमिकेकडेही लक्ष देतो.४प्रश्न : वैयक्तिक आयुष्यात तू कुणाला प्रेरणास्थानी पाहतोस?- शिवाजी महाराजांना मी प्रेरणास्थानी मानतो. त्यांचे कार्य, त्यांची नीती मला खूप प्रेरणा देते.प्रश्न: स्टोरी संपूनही एखादे चॅनल जर शो केवळ टीआरपीसाठी पुढे नेत असेल तर याविषयी तुला काय वाटते?- ज्याअर्थी टीआरपी आहे म्हणजे प्रेक्षकांना ती मालिका आवडतेय. कथानक संपूनही जर मालिकेला टीआरपी मिळतो आहे, तर काय हरकत आहे? या सर्व गोष्टी म्युच्युअल असतात. प्रश्न : सध्या वेबसीरिजचे वारे वाहत आहे. विविध मराठी कलाकार यात काम करायला तयार होत आहेत. तुला जर संधी मिळाली तर आवडेल का काम करायला?- मला वेबसीरिजमध्ये काम करायला आवडेल. एक नवे माध्यम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जे खूपच फ्री आहे, कुठल्याही चॅनेलचा अंकुश त्यावर नाही. तशी संधी मिळाली तर नक्कीच काम क रेन.४प्रश्न: आत्तापर्यंत मालिकेचा १००० भागांचा प्रवास कसा होता?- मालिकेसोबत आत्तापर्यंत केलेला प्रवास छान होता. शूटिंग सुरू होऊन तीन वर्षे झाली. एवढा प्रवास होईल असं वाटलं नव्हतं. फार तर सात-आठ महिने मालिका चालेल असं वाटलं होतं. अनेकांना मालिका आवडतेय हे यावरूनच कळतेय. तशा प्रतिक्रियाही मला मिळत आहेत, याचा आनंद वाटतोय. ४प्रश्न : मालिकेचे दुसरे पर्व लवकरच सुरू होणार आहे. ज्यामध्ये तुकारामांच्या मुखी विठ्ठल-रखुमाईची संसारगाथा बघायला मिळणार आहे, काय सांगशील?- तुकाराम आणि आवली यांच्यावर प्रेक्षकांनी आत्तापर्यंत भरभरून प्रेम केलं. तसंच आता या दोघांच्या दृष्टीतून प्रेक्षकांना विठ्ठल-रखुमाई यांची संसारगाथा पाहावयास मिळणार आहे. ती देखील प्रेक्षकांना आवडणार, यात काही शंकाच नाही.