नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकतेच मेंटल हेल्थ डिप्रेशन आणि एंजायटी अर्बन सोसायटीची समस्या असल्याचे म्हटले होते. नवाजच्या म्हणण्यावरुन वादाला सुरूवात झाली होती. खरेतर काही लोकांचे म्हणणे होते की, नवाज कसा मेंटल हेल्थबाबत इतका इसंसेटिव्ह असू शकतो. दरम्यान आता अभिनेता अध्ययन सुमनने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एकेकाळी अध्ययन सुमन मेंटल हेल्थचा सामना करत होता. त्याने नवाजच्या स्टेटमेंटवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कोणत्या संदर्भात बोलला असेल हे मला माहीत नाही. त्यांच्या मतांवर प्रतिक्रिया देणारा मी नाही. होय, पण मला हे नक्की सांगायचे आहे की मानसिक आरोग्याला शहरी किंवा देसी अशा गोष्टींमध्ये विभागण्याऐवजी गांभीर्याने घ्या, तर बरे होईल. खरे तर ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे आणि केवळ देशातच नाही, तर संपूर्ण जागतिक स्तरावर लोक नैराश्याने ग्रासले आहेत, हे लोकांनी समजून घेतले पाहिजे.
आत्महत्येचा विचार मनात यायचाअध्ययन पुढे म्हणाला की, मी स्वतः या ट्रॉमामध्ये बराच काळ राहिलो होतो. मी देवाचा आभारी आहे की माझ्या पालक आणि मित्रांनी मला वाचवले होते. एक काळ होता जेव्हा मी स्वतःला संपवण्याचा विचार करत होतो. खरेतर मला तो काळ आठवायचा देखील नाही. तासन् तास बेडवर पडून पंख्याकडे पाहत राहायचो. माझ्या जीवनात काहीच ध्येय उरले नसल्याचे वाटत राहायचे. सगळे काही संपल्याचे वाटायचे. ज्याचे इतके चांगले लाँच झाले, त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली. आजही लोकांच्या ओठांवर त्याचे गाणे असते.तरीदेखील काम मिळत नाही. हे सर्व गोष्टी त्रास देतात आणि मग सेल्प डिस्ट्रॅक्टिव्ह मोडवर जात होतो.
मित्र आणि पालकांनी यातून बाहेर काढले...ज्या विद्यार्थ्यांनी नैराश्य, चिंता यासारख्या मानसिक समस्यांवर मात केली आहे. ते त्यांचे श्रेय त्यांच्या मित्रपरिवाराला देतात. अध्ययनदेखील त्यावेळी त्याच्या मित्रांनी खूप मदत केली, असे सांगतो. तो पुढे म्हणाला की, ते रोज माझ्या घरी यायचे आणि फक्त माझं ऐकायचे. तुमच्या आयुष्यात कोणीतरी असावं जे फक्त तुमचं ऐकतात आणि ज्यांच्या समोर तुम्ही तुमच्या आतलं विष बाहेर काढता. त्यांच्याशी बोलताना मला खूप हलकं वाटायचं. अर्थात डॉक्टरही होते पण माझ्या मित्रांनी त्यांच्यापेक्षा जास्त काम केले आहे. त्यावेळी पालकांचाही प्रचंड पाठिंबा होता.
कोणीतरी असावे ज्याच्यासोबत आपण शेअर करु शकतोअध्ययन पुढे म्हणाला की, हा आजार मुळापासून नष्ट करता येणार नाही. हा काळ तुम्हाला विनाकारण त्रास देत राहील. तुम्हाला फक्त त्याच्याशी लढण्याचे कौशल्य शिकावे लागेल. आजही मी बर्याच वेळा अस्वस्थ होतो, मग मला आठवते की जेव्हा मी त्याला इतक्या वाईट काळावर मात केली आहे. तेव्हा आता मी त्याला सहज हरवू शकतो. लोकांनी याबाबत सजग राहावे आणि याविषयी खुलेपणाने बोलावे, असे मला वाटते. कोणीतरी असावं ज्याच्यासोबत तुम्ही तुमच्या समस्या शेअर करू शकता.