कुशल बद्रिके (Kushal Badrike) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya)या कार्यक्रमातून तो घराघरांत पोहचला. आपल्या विनोदी शैलीच्या जोरावर कुशलने रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुशल सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि पोस्ट शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, आता त्याची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ज्यात त्याने नात्याबद्दल भाष्य केले आहे.
अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर स्वतःचा फोटो शेअर करत लिहिले की, “शोधून सापडणार नाहीत”, काही अशी माणसं आयुष्यातून निघून गेली ना, की माणसं “एकलकोंडी” होत जातात. फक्त स्वतःची होत जातात, स्वतः मधेच रमत राहतात. आणि मग, आयुष्यातून आणखीन माणसं गमाऊन बसू ह्या भीती पोटी हे लोक माणसं कमवायचीच राहून जातात. अश्या एकाकी माणसांना त्यांच्यावर सच्च प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं. बास ! :- सुकून.
कुशलच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. चाहत्यांसोबत सेलिब्रेटींनीही पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. पुष्कर जोगने कमेंटमध्ये लिहिले की, मी अजूनही आहे. मला तुझी खूप आठवण येते. पण तू बिझी असशील म्हणून तुला डिस्ट्रब करत नाही. आय लव्ह यू लॉट्स कुश्या. प्रार्थनाने इमोजी शेअर केली आहे. तर एका युजरने लिहिले की, सुकून जाशील भावा... असा एकटा नको बसू. दुसऱ्या एका युजरने म्हटले, हृदयस्पर्शी कॅप्शन. आणखी एकाने लिहिले की, कुशल बद्रिके कॅप्शन मस्त. पण एकलकोंड अजिबात रहायचं नाही 2/4 लोकांशी खुसपट काढायचीच समतोल राखायला … बाकी प्रेमाने वागणारे असतातच सोबत ती काही कुठे जात नाहीत प्रेम करायला जशी माणसं हवीत तशी भांडायला पण हवीत ... जगरहाटी आणि सुकुन.
वर्कफ्रंट...कुशल सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या नव्या हिंदी विनोदी कार्यक्रमात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचे चाहते त्याला हिंदी शोमध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.