दिग्गज कलाकारांचा दर्जेदार अभिनय आणि उत्कंठावर्धक कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘दिव्य दृष्टी’ या मालिकेनेप्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे. दृष्टीला भविष्यात काय घडणार आहे, ते पाहण्याची शक्ती असते; तर या भविष्यात बदल करण्याची शक्ती दिव्या हिच्याकडे असते. अर्थात कोणतीही विशेष शक्ती असली, तरी त्याबरोबर काही तोटेही येतात आणि या दोन्ही बहिणींना पिशाचिनींपासून धोका असतो. अभिनेत्री संगीता घोष हिने या मालिकेतील पिशाचिनीची व्यक्तिरेखा साकारली असून त्यात ती आपल्या अंगच्या अतिमानवी शक्तींचा वापर या दोन बहिणींविरोधात करते.देस में निकला होगा चाँद आणि विरासत यासारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेल्या संगीता घोषला विचारणा करण्यात आली की प्रत्यक्ष जीवनात तिलाही जर एखादी सुपरशक्ती प्राप्त झाली, तर ती कोणती असावी, असे तिला वाटते; त्यावर संगीता म्हणाली, “मालिकेची कथा-संकल्पना तयार करण्याची ताकद माझ्यात यावी, अशी माझी फार इच्छा आहे. मी एक पुस्तकप्रेमी वाचक असून दोन प्रसंगांच्या चित्रीकरणामध्ये, प्रवासात आणि वेळ मिळेल, तेव्हा मी पुस्तक वाचीत असते. वाचनाने तुमच्या मनाची कवाडे विस्तारतात. त्यामुळे जगातील सर्वच गोष्टींकडे एका नव्याच दृष्टिकोनातून पाहण्याची दृष्टी तुम्हाला लाभते. तुम्हाला अनेक विषय आणि गोष्टींचे ज्ञान मिळते. म्हणूनच मी जी पुस्तके वाचते, तशा कथा किंवा लेख लिहिण्याची शक्ती मला मिळावी, अशी माझी इच्छा आहे.”
संगीता घोषला खऱ्या आयुष्यात हवीय 'ही' सुपरशक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 7:15 AM
‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा आहे.
ठळक मुद्दे ‘दिव्य दृष्टी’ ही अंगी विशेष शक्ती असलेल्या दोन बहिणींची कथा