Join us

"मूर्ती लहान पण किर्ती महान", 9 वर्षाची चिमुरडी अंडर 19 च्या संघात

By admin | Published: April 25, 2017 5:44 PM

मूर्ती लहान पण किर्ती महान असं आपण अनेकदा म्हणतो... तेच आपल्याला सध्या ह्या चिमुकलीबद्दल म्हणावं लागेल.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, 25 - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणातच त्यांने गोलंदाजांची पिसे काढत क्रिकेटमध्ये वय महत्वाचे नसून प्रतिभा महत्वाची असते हे दाखवून दिले होते. असाच आणखी एक प्रकार भारताचा महिला क्रिकेटमध्ये घडला आहे. आज महिलाच्या अंडर-19 संघाची निवड झाली आहे. यामध्ये चक्क नऊ वर्षाच्या अनादि तागडेची निवड करण्यात आली आहे.
मूर्ती लहान पण किर्ती महान असं आपण अनेकदा म्हणतो... तेच आपल्याला सध्या ह्या चिमुकलीबद्दल म्हणावं लागेल. मध्यप्रदेशातल्या इंदौरमधील अनादि तागडेने क्रिकेटच्या जगात आपला इतिहास रचला आहे. या नऊ वर्षाच्या अनादिची अंडर- 19 महिला क्रिकेटमध्ये निवड झाली आहे. चौथीमध्ये शिकणारी अनादि वेगवान गोलंदाजही आहे. तिची गोलंदाजी बघून निवडकर्तेही हैरान झाले होते. तिची कामगिरी बघून एवढ्या लहान वयातही तिची निवड करण्यात आली.
 
अनादिची निवड भारताच्या महिला अंडर 19 संघात झाल्यानंतर आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना, यावेळी माध्यामांशी बोलताना तिचे वडिल म्हणाले. अनादिला क्रिकेटचा वारसा तिच्या आईकडून मिळाला आहे. तिची आई एक चांगली क्रिकेटर होती. मुलीच्या प्रशिक्षणासाठी कुणी चांगला कोच मिळाला नाही म्हणून तिने स्वत:च तिच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. बेसिक प्रशिक्षणानंतर त्यांनी अनादिला "हॅप्पी वंडर्स क्लब"मध्ये भरती केले. हार्दिक पांड्याची ती मोठी फॅन आहे. त्याची बॅटिंग, बॉलिंग, फिटनेस तिला आवडतात. हार्दिक बॅटिंगसोबत बॉलिंगही चांगली करतो. त्यासोबत तो फिटही आहे. आपल्यालाही त्याच्यासारख बनायचंय, असं अनादि म्हणते. तिला सचिनला भेटण्याची इच्छा आहे. तिची आईही सचिनची फॅन आहे. अनादिच्या वडिलांचं म्हणण आहे की, तिच्या आईने त्यांच्यासोबत लग्न केलं त्याला कारणही सचिनच आहे. कारण त्यांचा आणि सचिनचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो. तसेच त्यांच्या वडिलांचे नावही सारखेच आहे.