Join us

मुलींनी कंडोम खरेदी केलं तर गैर काय?; बोल्ड विधानामुळे प्रनुतन बहल चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 12:18 PM

Pranutan Bahl : काही दिवसांपूर्वीच प्रनुतन बहलची मुख्य भूमिका असलेला 'हेल्मेट' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने रिपाली ही भूमिका साकारली आहे

ठळक मुद्देयाकाही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत प्रनुतनने कंडोमविषयी प्रश्न उपस्थित करुन नेटकऱ्यांच्या नजरा वेधून घेतल्या

"मुलींनी कंडोम खरेदी केलं तर त्यात गैर काय?", असा प्रश्न विचारुन अभिनेत्री प्रनुतन बहल (Pranutan Bahl) सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अलिकडेच प्रनुतनची मुख्य भूमिका असलेला हेल्मेट(Helmet)  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात कंडोमविषयी असलेल्या समज-गैरसमजावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी प्रनुतनने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने कंडोमविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नामुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या आहेत. 

"एखादी मुलगी मेडिकलमध्ये गेली आणि तिने कंडोम खरेदी केले तर तिच्या आजूबाजूचे लोक लगेचच कान आणि डोळे टवकारून पाहू लागतात. पण, मला एक सांगा जर एखाद्या मुलीने कंडोम खरेदी केले तर त्यात गैर काय आहे? हा कोणता गुन्हा तर नाही", असं प्रनुतन म्हणाली.

पुढे ती म्हणते, "एक मात्र खरं आहे की आपल्या समाजात सेक्स एक टॅबू मानला जातो. त्यामुळे कंडोमविषयी बोलताना अनेक जण काचरतात. आमच्या चित्रपटातून याच विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. कंडोम खरेदी करणं यात काहीच चूक नाही हेच आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. कंडोमच्या खरेदीमुळे अनेक गोष्टी टाळता येऊ शकतात. वाढती लोकसंख्या, अनेक आजार, अनावश्यक प्रेग्नंसी. मी स्वत: तर कधीच कंडोम खरेदी केले नाहीत. पण, आशा आहे की हेल्मेटच्या मदतीने समाजातील हा कंडोमविषयी असलेला गैरसमज दूर होईल आणि मुलीदेखील आत्मविश्वासाने कंडोमची खरेदी करतील."

सिद्धार्थसाठी Prayer Meetचं आयोजन; या पद्धतीने चाहत्यांना होता येईल सहभागी 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रनुतन बहलची मुख्य भूमिका असलेला 'हेल्मेट' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने रिपाली ही भूमिका साकारली असून रुपाली बिंधास्त असून ती न घाबरता बेधडकपणे कंडोमची विक्री करतांना दाखवली आहे. 

टॅग्स :प्रनूतन बहलबॉलिवूडसेलिब्रिटी