Join us

मंजिरी पुपाला अभिनेत्री झाली नसती तर ह्या क्षेत्रात केले असते करियर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 12:55 PM

‘इश्कबाझ - प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत एसीपी आदिती देशमुख या नायिकेची भूमिका मराठीतील अभिनेत्री मंजिरी पुपाला साकारीत आहे.

ठळक मुद्देमंजिरी पुपाला पोलीस अधिकारीच्या भूमिकेत एसीपी आदिती देशमुख ही भूमिका देते प्रेरणा - मंजिरी

‘स्टार प्लस’वरील ‘इश्कबाझ - प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत एसीपी आदिती देशमुख या नायिकेची भूमिका मराठीतील अभिनेत्री मंजिरी पुपाला साकारीत आहे. या कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारीच्या भूमिकेमुळे मंजिरीला एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे.

या अनुभवाविषयी मंजिरी म्हणाली, “जेव्हा मला या भूमिकेसंबंधी विचारणा करण्यात आले, तेव्हा माझ्या स्वत:च्या दृष्टिकोनाप्रमाणेच दृष्टिकोन आणि मूल्यदर्शन असलेली भूमिका रंगविण्याच्या कलपनेने मी खूपच उत्साहित झाले होते. एक सामान्य मुंबईकर या नात्याने मला आजवर पोलिसांचा फार चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बाबतीत मी नेहमीच अचंबित असते. त्यांच्याकडे पाहून मनात सुरक्षिततेची आणि आधाराची भावना निर्माण होते. आदिती देशमुख ही अतिशय कर्तव्यकठोर अधिकारी असते. आपल्या कर्तव्याच्या आड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला ती जुमानत नाही. कर्तव्य आणि न्याय याबाबत ती अतिशय काटेकोर असते. ही व्यक्तिरेखा मला नेहमीच प्रेरणा देते. मी जर अभिनेत्री झाले नसते, तर नक्कीच एक आयपीएस अधिकारी बनले असते. जी गोष्ट चुकीची आहे, त्याविरोधात आवाज उठविणे आणि त्यात बदल करण्यासाठी तुमच्या हाती सत्ता असणे या गोष्टी मला फार भावतात. म्हणूनच आदितीची भूमिका रंगविताना माझ्या मनात एक गौरवाची भावना निर्माण होते कारण ती एक कर्तव्यकठोर आणि निश्चयी महिला आहे. अशा महिलांकडे मी माझे प्रेरणास्थान म्हणून बघते.”

मंजिरीने पोलीस अधिकारीची भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत केली आहे. 

टॅग्स :मंजिरी पुपालाइश्कबाज मालिका