Join us

‘तुमच्यात ‘गट्स’ असतील, तर बॉलिवूडमध्ये या’

By admin | Published: July 12, 2017 2:23 AM

आता ती एका आगामी चित्रपटामधून महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी केलेला हा दिलखुलास संवाद

-Aboli Kulkarniकीर्ती कुल्हारी हिने ‘खिचडी : द मुव्ही’ या कॉमेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. ‘शैतान’ चित्रपटानंतर तिला ‘पिंक’ चित्रपटाची आॅफर आली. ‘पिंक’ नंतर तिच्या करिअरला ‘यू टर्न’ मिळाला. आत्तापर्यंत विविधांगी भूमिका साकारताना शिकण्याची धडपड, जिद्द, उमेद तिने टिकवून ठेवली. आता ती एका आगामी चित्रपटामधून महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी केलेला हा दिलखुलास संवाद... तू ‘जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन’मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. मीडियात करिअर करण्याचा विचार केला नाही का?- मला अभिनेत्रीच व्हायचे होते. त्यामुळे शिक्षण घेत असताना मला जर्नालिझम हा विषय वेगळा आणि इंटरेस्टिंग वाटला. म्हणून मी याचे शिक्षण घेतले. सध्याचा मीडिया खूपच व्यापक झाला आहे. बातम्या, स्टोरीज आणण्याचे पत्रकारांवरही प्रेशर असते. त्यामुळे असे वाटते की, क्वॉलिटी घसरते आहे. ‘ओव्हरडोस आॅफ इन्फॉर्मेशन’ होतेय, असे मला वाटते. तुझे वडील भारतीय नौसेनेत कार्यरत आहेत. घरातील त्यांच्या शिस्तीमुळे तुझ्यावर किती परिणाम झाला?- माझे वडील नेव्हीमध्ये होते. पण, चित्रपटात जसे दाखवले जाते तसे स्ट्रिक्ट अगदीच नव्हते. ते आम्हा मुलांसोबत नेहमीच खूप कूल असायचे. कोणत्याही गोष्टीचं कधीच आमच्यावर प्रेशर नसायचं. त्यांना मी माझ्या आयुष्यात प्रेरणास्थानी मानते. कुटुंबाची जबाबदारी, कर्तव्ये पार पाडताना मी पाहिलंय. त्यामुळे त्यांच्यातील काही गुण माझ्यात नक्कीच आले असतील.‘खिचडी : द मुव्ही’ या कॉमेडी चित्रपटामधून तू बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहेस. त्यानंतर कॉमेडी चित्रपट करावासा का वाटला नाही?- खरं तर, त्यानंतर मी इरफान खानसोबत ‘रायता’ हा कॉमेडी चित्रपट के ला आहे. अलीकडेच आम्ही या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. अभिनय देव दिग्दर्शित हा चित्रपट नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये रिलीज होईल. मला कॉमेडी चित्रपटात काम करायला प्रचंड आवडतं. मी करत राहीन. ‘पिंक’ चित्रपटानंतर तुझ्या आयुष्यात काय बदल झाला? चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?- ‘पिंक’ चित्रपट माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतरच मला यासारख्या चित्रपटाची आॅफर मिळाली. चांगला चित्रपट, आव्हानात्मक भूमिका हे सर्व ‘पिंक’चेच देणं आहे. अमिताभ बच्चन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे स्वप्नच. व्यक्ती कितीही मोठा झाला तरीही किती नम्र असू शकतो, हे त्यांच्याकडे पाहिल्यावर कळते.आगामी चित्रपटामधील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?- मधुर भांडारकर दिग्दर्शित या चित्रपटात मी एका युवतीची भूमिका साकारतेय. तिला कविता करण्याची आवड असते. तिला लग्न करायचं असतं, पतीसोबत संसार थाटायचा असतो; मात्र आणीबाणीमुळे तिचा संसार कसा उद्ध्वस्त होतो, याचे चित्रण यात केले आहे. आक्रोश, हतबलता आणि त्यातून परिस्थितीशी दोन हात करत लढणारी एक सर्वसामान्य महिला अशा चौफेर कथानकावर हा चित्रपट भाष्य करतो.आयुष्यात तुझे प्रेरणास्थान कोण आहे?- माझ्या आईवडिलांना मी प्रेरणास्थानी मानते. खरंतर, आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे आपण बरंच काही शिकत असतो. जे आपल्याला कधीकधी लक्षात येत नाही. आयुष्यानी एवढं काही शिकवलंय ना की, तेच प्रेरणास्थानी मानावेसे वाटते.बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसताना काम करणं, प्रोजेक्ट्स मिळणं किती अवघड आहे?- स्ट्रगल तर प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असतो. तो असलाच पाहिजे. जर तुमच्यात सहनशक्ती असेल, तुमचे नशीब बलवत्तर असेल तर नक्कीच तुम्हाला प्रोजेक्टस मिळतील.