दिमाखात रंगला IIFA 2024 पुरस्कार सोहळा! कलाकारांच्या परफॉर्मन्सने वाढवली शान, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2024 03:42 PM2024-09-29T15:42:55+5:302024-09-29T16:06:45+5:30

यंदाचा IIFA 2024 पुरस्कार सोहळा अबू धाबीमध्ये संपन्न झाला. बॉलिवूडमधील अनेक तारे-तारका या सोहळ्याला उपस्थित होते.

यंदाच्या IIFA 2024 मध्ये सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे शाहरुख खानने. शाहरुखने त्याच्या खास शैलीत IIFA 2024 च्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.

IIFA 2024 मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी केलेला नृत्याविष्कार चांगलाच गाजला. ६९ व्या वर्षी रेखा यांनी केलेला डान्स बघून सर्व थक्क झाले

विकी कौशलने त्याच्या यावर्षी गाजलेल्या तौबा तौबा गाण्यावर कमाल डान्स केला. IIFA 2024 विकीचा स्टायलिश लूक चर्चेत राहिला

बोल्ड आणि ब्यूटिफूल अभिनेत्री नोरा फतेहीने IIFA 2024 पुरस्कार सोहळ्यात सुंदर डान्स केला. नोराने केलेल्या डान्सला सर्वांनी चांगली दाद दिली

बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्री अनन्या पांडेने IIFA 2024 मध्ये डान्स करुन सर्वांची वाहवा मिळवली. अनन्याला पुरस्कार मिळाला नसला तरीही तिच्या डान्सने कौतुक मिळवलं

डान्स मास्टर प्रभुदेवा आणि अभिनेता शाहिद कपूर यांच्या डान्सच्या जुगलबंदीने IIFA 2024 पुरस्कार सोहळ्याला चार चॉंद लावले.

अभिनेत्री क्रिती सेनॉन महिला सक्षमीकरणाचा दृष्टीकोन घेऊन सामाजिक भान जपत IIFA 2024 पुरस्कार सोहळ्यात दोन छोट्या मुलींना घेऊन मंचावर आली होती.