सोमवारी रात्री आयफा अवार्डच्या सोहळ्याला सुरुवात झाली. यंदाच्या 20 व्या आयफा सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, यंदा हा सोहळा मुंबईत होतोय. मायानगरीत हा सोहळा होत असल्याने बॉलिवूड कलाकारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. आयफा अवार्डपूर्वी काल रात्री ‘आयफा रॉक्स 2019’चे आयोजन केले गेले. कतरीना कैफ, राधिका आपटे, विकी कौशल, रकुल प्रीत सिंग, रिचा चड्ढा, अर्जुन रामपाल अशा अनेकांनी या इव्हेंटमध्ये ‘चार चाँद’ लावलेत. याच रात्री चित्रपटांचे तांत्रिक पुरस्कार देण्यात आलेत.
‘अंधाधुन’साठी श्रीराम राघवन, अरिजीत बिस्वास, पूजा लाढा सुरती आणि योगेश चंदेकर यांना बेस्ट स्क्रिनप्ले पुरस्कार देण्यात आला. याच चित्रपटासाठी पूजा लाढा सुरती यांना बेस्ट एडिटींग तर अजय कुमार पी. बी. यांना बेस्ट साऊंड मिक्सिंग अवार्डने गौरविण्यात आले. डेनियल बी जॉर्ज यांना बेस्ट बॅकग्राऊंड स्कोर पुरस्कार देण्यात आला.