बॉलिवूड सेलिब्रिटी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह राहतात. चाहत्यांशी रोज नवा संवाद साधतात. स्वत:चे फोटो, व्हिडीओ शेअर करत आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक क्षण चाहत्यांशी शेअर करतात. इलियाना डिक्रूज ही सुद्धा याला अपवाद नाही. नुकताच इलियानाने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. चाहत्यांसाठी तिने ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले. पण यादरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने इलियानाची सटकली आणि तिने या चाहत्याला सडेतोड उत्तर दिले.
तू कोणत्या वयात व्हर्जिनिटी गमावलीस? अन् चाहत्याच्या प्रश्नाने तिची सटकली!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 12:46 PM
चाहत्यांसाठी तिने ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन ठेवले. पण यादरम्यान एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाने तिची सटकली आणि तिने या चाहत्याला सडेतोड उत्तर दिले.
ठळक मुद्देसध्या इलियाना तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.