Join us

IIFA २०१६ पुरस्कारांवर 'बाजीराव-मस्तानी'ची छाप

By admin | Published: June 26, 2016 8:07 AM

स्पेनमधील माद्रिद येथे १७व्या IIFA २०१६च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी‘ चित्रपटाने बाजी मारली

 
माद्रिद, दि. २६ : स्पेनमधील माद्रिद येथे १७व्या IIFA २०१६च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात रणवीरसिंग, दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बाजीराव मस्तानी‘ चित्रपटाने बाजी मारली. 'बाजीराव-मस्तानी'साठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिर्ग्दशकाचा तर णवीर सिंगला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. तर दीपिका पदुकोणला पिकू साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला एकूण नऊ पुरस्कार मिळाले. यापाठोपाठ पिकू चित्रपटाने सर्वाधिक म्हणजे पाच पुरस्कार मिळाले. सलमान खानची भूमिका असलेल्या 'बजरंगी भाईजान'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. 
 
पुरस्कार विजेते -
सर्वोत्कृष्ट चित्रपट - बजरंगी भाईजान
सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणवीरसिंग (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - दीपिका पदुकोण (पिकू)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - संजय लीला भन्साळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - अनिल कपूर (दिल धडकने दो)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - प्रियांका चोप्रा (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख अभिनेत्री - भूमी पेडणेकर (दम लगा के हैशा)
सर्वोत्कृष्ट पटकथा - जूही चतुर्वेदी ( पीकू )स्पेशल अवॉर्ड फॉर वुमन ऑफ द ईअर - प्रियांका चोप्रासर्वोत्कृष्ट डेब्यू कपल अवॉर्ड - सूरज पंचोली आणि आथिया शेट्टीबेस्ट परफार्मेंस इन ए नेगेटीव्ह रोल - दर्शन कुमार ( NH10 )बेस्ट परफॉर्मेंस इन कॉमिक रोल - दीपक डोब्रियाल (तनु वेड्स मनु रिर्टन्स) सर्वोत्कृष्ट पदार्पण (मेल) - विकी कौशल ( मसान)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - मोनाली ठाकुर ( मोह-मोह के धागे, दम लगा के हईश्शा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायका (मेल) - पपोन ( मोह-मोह के धागे - दम लगा के हईश्शा)