Join us

बहिणीच्या लग्नात गर्लफ्रेंडसह दिसला इमरान खान, साऊथ अभिनेत्रीला करतोय डेट; Photos व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 09:17 IST

अभिनेता इमरान खान हा आमिर खानचा भाचा आणि आयराचा चुलत भाऊ आहे.

सध्या मनोरंजनविश्वात आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाचीच चर्चा आहे. फिटनेस ट्रेनर नुपूर शिखारेसोबत तिने रजिस्टर पद्धतीने लग्न केले. ३ जानेवारी रोजी मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एंड येथे हा सोहळा पार पडला. आयरा आणि नुपूरच्या कुटुंबातील सदस्यांसह त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींनी लग्नात हजेरी लावली. यावेळी 'जाने तु या जाने ना' फेम अभिनेता इमरान खान (Imran Khan) त्याच्या कथित गर्लफ्रेंडसह आला होता. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेता इमरान खान हा आमिर खानचा भाचा आणि आयराचा चुलत भाऊ आहे. त्यांची आणखी एक चुलत बहीण झेन खानने आयराच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये इम्रान खानसोबतही एक फोटो आहे. त्यात इम्रानची गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनही (Lekha Washington) पोज देताना दिसत आहे. याशिवाय झेनने इम्रान खान आणि त्याची लेक इमारासोबतही एक मिरर सेल्फी पोस्ट केला आहे. या सगळ्यात इमरानची पत्नी अवंतिका कुठेच दिसली नाही. गेल्या काही वर्षांपासून दोघंही वेगवेगळे राहत आहेत. 

लेखा वॉशिंग्टन दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. इमरानला लेखासोबत अनेकदा पाहिले गेले आहे. तेव्हापासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या. यामुळेच इमरान आणि अवंतिका यांच्या नात्यात दुरावा आला. इमरान १९ वर्षांचा असतानाच अवंतिकाला डेट करत होता. 10 जानेवारी 2011 रोजी त्यांनी आमिर खानच्या पाली येथील लग्नगाठ बांधली. या लग्नात फक्त जवळचे लोक उपस्थित होते. लग्नानंतर दोन वर्षांनी अवंतिकाने मुलीला जन्म दिला. काही वर्षांपासून इमरान आणि अवंतिका वेगळे राहत आहेत.लग्नानंतर ८ वर्षांनी त्यांचं नातं संपुष्टात आलं आहे. सध्या इमरान आणि लेखा एकमेकांना डेट करत आहेत.

टॅग्स :इमरान खानआमिर खानइरा खानलग्न