Join us

KBC 16 मध्ये महाभारताविषयीचा ५० लाखांचा प्रश्न! स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला माहितीये का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 13:18 IST

KBC 16 मध्ये महाभारताविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने खेळ सोडला

 KBC 16  ची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सीझनमध्ये सध्या विविध थीम घेऊन छोटे स्पर्धक सहभागी झाले आहेत. सध्या  KBC 16  मध्ये ज्युनियर ही थीम सुरु असून प्रेक्षकांना ही थीम चांगलीच आवडलेली दिसतेय.  KBC 16 मध्ये नुकत्याच सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला महाभारताविषयी ५० लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. परंतु या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने स्पर्धकाने खेळ सोडला. जाणून घ्या. 

हा होता महाभारताविषयी ५० लाखांचा प्रश्न?

KBC 16 मध्ये महाभारताविषयी अलीकडेच पार्थ उपाध्याय हा स्पर्धक सहभागी झाला होता. पार्थला KBC 16 मध्ये ५० लाखांचा महाभारताविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. तो पुढीलप्रमाणे:-  महाभारत के अनुसार, इनमें से किसका वध उसी नाम के एक गंधर्व ने किया था? या प्रश्नाचे ४ ऑप्शन होते. A. चित्रांगद B. विचित्रवीर्य C. शांतनु D. पांडू. पार्थला या प्रश्नाचं उत्तर माहित नसल्याने त्याने २५ लाखांची रक्कम घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

काय होतं या प्रश्नाचं उत्तर?

या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन A. चित्रांगद. अशाप्रकारे ५० लाखांच्या प्रश्नावर पार्थने खेळ सोडला. पार्थला हात बघून भविष्य सांगण्याची कला होती. हे जेव्हा हॉटसीटवर बसलेल्या बिग बींना समजलं तेव्हा त्यांनी हॉट सीटवरुन उठत आपला हात पार्थकडे नेला. पार्थने बिग बींचा हात बघताच सांगितलं की, "तुमच्या येणाऱ्या करिअरमध्ये कोणतीही बाधा येणार नाही. तुमच्या डोक्यावर मात्र अनेक जबाबदाऱ्या आहेत." असं ऐकताच अमिताभ बच्चन चकीत झाले आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले..

 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनमहाभारत