बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan)च्या चित्रपटांची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. तसे, अभिनेत्याचे अनेक चित्रपट येणार आहेत. पण अलीकडेच त्याच्या एका अशा चित्रपटाविषयी माहिती समोर येत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत एक नाही, दोन नाही, तीन नाही तर दहा-दहा अभिनेत्री दिसणार असून या चित्रपटाचे नाव आहे 'नो एंट्री' (No Entry). यावेळी सलमान खान सध्या खूप व्यग्र आहे. एकानंतर एक त्याच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. नुकतेच त्याने 'कभी ईद कभी दिवाळी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली. त्याने स्वत: त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली. आता त्याच्या आणखी एका चित्रपटाची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी बातमी आली होती की 'नो एंट्री'चा सीक्वल येणार आहे, ज्याचे नाव 'नो एंट्री में एंट्री' असे असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात दहा अभिनेत्री असणार आहेत. मात्र, अद्याप या अभिनेत्रींच्या नावाचा खुलासा करण्यात आलेला नाही.
सलमान खानच्या आगामी नो एंट्रीच्या सीक्वलबद्दल एक अपडेट समोर आली आहे, ज्याचे शीर्षक 'नो एंट्री में एंट्री' असणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या सीक्वेलमध्ये २००५ मध्ये आलेल्या नो एंट्री चित्रपटाचा मुख्य नायक म्हणजेच सलमान खान, अनिल कपूर आणि फरदीन खान दिसणार आहेत. त्याच्या प्रत्येक पात्रासोबत एक नायिका असेल. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. इतकेच नाही तर या चित्रपटासाठी फरदीन खाननेही बरेच वजनही कमी केले आहे. असे म्हटले जात आहे की सलमान, अनिल आणि फरदीन व्यतिरिक्त बिपाशा बसू, ईशा देओल, लारा दत्ता आणि सेलिना जेटली देखील मुख्य भूमिकेत असू शकतात, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही.