ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 10 - चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा 180 धावांनी दारुण पराभव केला होता. भारताच्या या पराभवानंतर विराटसेनेवर टीकेची झोड उडवली होती. या टीकाकांरांच्या यादीत आता राखी सावंतची भर पडली आहे. वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत असणाऱ्या राखीने आता थेठ भारतीय संघावर निशाना साधला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकविरोधात झालेल्या पराभवाला भारतीय संघाचा अतिआत्मविश्वास आणि खेळाडूंनी सामन्यापूर्वी केलेली पार्टी जबाबदार असल्याचे मत राखीने व्यक्त केले आहे. फस्ट पोस्टला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खळबळजनक आरोप केला आहे. या मुलाखतीत राखीने भारतीय संघाने पाकविरोधातील अंतिम सामन्यापूर्वी पार्टी केल्याचा आरोप केला आहे. या पार्टीत भारतीय संघातील खेळाडूंनी दारु आणि सिगारेट पिल्यामुळे त्यांना खेळात सातत्या राखता आले नाही असा आरोप तिने केला आहे. कर्णधार विराट कोहलीवरही राखीनं जोरदार टीका केली आहे. सर्व भारत विराटच्या प्रेमात आहे, मला ही विराट आवडतो. पाकविरोधातील अंतिम सामना भारत सहज असे वाटत होतं पण झाले उलटेच पाकनेच भारताचा 180 धावांनी पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत सुरवातीचे सर्व सामने जिंकले होते त्यामुळे खेळाडूंना गर्व चढला होता असा आरोर तिने यावेळी केला.या मुलाखतीत राखीने विराटला एक इशाराही दिला आहे. विराटने वेळीच सुधारावे नाहीतर मी भारताच्या प्रत्येक सामन्यावेळी मैदानात येईन. मग तुला माझ्यावरून नजर हटवणे अवघड होऊन बसेल, अशी धमकीच राखीने दिली आहे.
(कळत नाही मोदींनी तुम्हाला मुख्यमंत्री का बनवलं? राखी सावंतची योगींवर टीका)
(कोणतेही आरोप करायला मी सलमान नाही - राखी सावंत)
(राखी सावंतच्या आंगोपांग झळकले मोदी)
याच मुलाखतीत राखी सावंतने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसण्यासाठी लागणारे कोणतेच गुण आदित्यनाथ यांच्याकडे नाहीत, कळत नाही तुमचे कोणते गुण पाहून पंतप्रधान मोदींनी तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं अशा शब्दांमध्ये राखी सावंतने योगींवर खरमरीत टीका केली.
व्हिडिओ पाहा :
कत्तलखाने बंद करण्याच्या योगी आदित्यनाथांच्या निर्णयाला राखीने यावेळी कडाडून विरोध केला. मुसलमानांनी बीफ खाऊ नये हे सांगण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असा सवालही तिने उपस्थित केला आहे. नेहमी वादामध्ये राहणारी राखी आदित्यनाथांचा उल्लेख करताना पुढे म्हणाली, जर तुम्ही स्वतः हिंदू आहात तर तुम्ही इतर सगळ्यांना हिंदू बनवू शकत नाही. ज्याप्रकारे मुसलमान तुमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्याप्रमाणे तुम्हीही त्यांच्या मुद्द्यांपासून दूर रहावं. हिंदू लोकं मुस्लिमांना दगडाने ठेचून मारत आहेत हा कोणता न्याय आहे योगी जी असा सवाल तिने केला.
दरम्यान 7 जुलै रोजी अभिनेत्री राखी सावंत बुरखा परिधान करुन लपूनछपून गुरुवारी पंजाबमधील लुधियाना कोर्टात हजर झाली होती. रामायणकार वाल्मिकी यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर राखी सावंतविरोधात लुधियाच्या न्यायदंडाधिकारी कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोर्टात हजर झाल्यानतंर न्यायाधीश विश्व गुप्ता यांनी राखी सावंतला जामीन मंजूर केला. राखी सावंतविरोधात 2 जून रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. वारंवार समन्स बजावूनही राखी 9 मार्चला सुनावणीसाठी कोर्टात हजर न राहिल्याने तिला समन्स बजावण्यात आलं होतं.