Join us

९३व्या ऑस्कर अवॉर्डसाठी भारताकडून मल्याळम सिनेमा 'जल्लीकट्टू'ला नामांकन, या चित्रपटांना टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 6:17 PM

९३व्या ऑस्कर अवॉर्डसाठी मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ला नामांकन देण्यात आले आहे.

९३व्या ऑस्कर अवॉर्डसाठी मल्याळम चित्रपट जल्लीकट्टूला नामांकन देण्यात आले आहे. भारताकडून ऑस्करसाठी जल्लीकट्टू शिवाय बरेच आणखीन चित्रपट शर्यतीत होते. यात शंकुतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोंसले, गुलाबो सिताबो, सिरीयस मॅन, बुलबुल, कामयाब, द पिंक इज स्काय या चित्रपटांचा समावेश होता. याशिवाय मराठी चित्रपट बिटरस्वीट आणि डिसाइपलदेखील या शर्यतीत होते.

जल्लीकट्टू चित्रपटाची कथा वार्के आणि अँटनी नामक व्यक्तीवर आधारीत आहे जो एक कत्तलखाना चालवत असतो. त्याच्या कत्तलखान्यामध्ये म्हशींना मारून विकले जात असते. एक दिवस एक म्हस कत्तलखान्यातून पळून जाते आणि संपूर्ण गावात दहशत माजवते. तिला कंट्रोल करण्यासाठी पोलिसांना बोलवले जाते. संपूर्ण गाव तिला पकडण्यासाठी एकत्र येतात. मात्र म्हस कुणाच्या कंट्रोलमध्ये येत नाही. चित्रपटात म्हशीवर वेगवेगळ्या पद्धतीने कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करताना दाखवले गेले आहे. म्हस गर्दीतून स्वतःला कशी वाचवते हे दाखवले गेले आहे.

जल्लीकट्टू चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर २०१९ टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता. त्यानंतर हा चित्रपट २४व्या बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला होता. जल्लीकट्टूचे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांना भारतातील ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI)मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाला या वर्षाच्या सुरूवातील ५०व्या केरळ राज्य चित्रपट पुरस्कारात दोन पुरस्कार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रणचा पुरस्कार मिळाला होता.

टॅग्स :ऑस्कर