Join us

सिनेमांची चलती! यावर्षी भारतीय सिनेसृष्टीतून तब्बल १२ हजार कोटींची उलाढाल होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 11:19 AM

एकामागोमाग एक चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहेत.

२०२३ म्हणजे बॉलिवूडसाठी सुवर्णवर्ष ठरत आहे. आधी 'पठाण' मग 'गदर 2' (Gadar 2) आणि आता 'जवान' (Jawan) सिनेमामुळे बॉक्सऑफिसवर पैशांचा पाऊस पडतोय. एकामागोमाग एक चित्रपट कोट्यवधींची कमाई करत आहेत. याशिवाय 'OMG 2', 'ड्रीम गर्ल 2','रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमांनी उत्तम व्यवसाय केलाय. तर 'टायगर 3', 'डंकी', 'अॅनिमल' हे चित्रपट रांगेत आहेतच. याशिवाय 'वारिसू', 'जेलर' या साऊथच्या सिनेमांनीही बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. यावरुन असा अंदाज लावला जात आहे की यावर्षी भारतीय सिनेसृष्टीत तब्बल १२ हजार कोटींची उलाढाल होईल. 

एंटरटेन्मेंट आणि मीडिया अॅनालिस्ट आशिष फेरवानी यांच्या अनुमानानुसार, २०२३ मध्ये ११ ते १२ हजारांचा थिएट्रिकल रेव्हेन्यू जमा होईल जो कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीपेक्षाही जास्त आहे. ही कमाई भारतातली असून यामध्ये भारतीय सिनेमांचं वर्ल्डवाईड कलेक्शन सामील नाही. कोरोनामुळे भारतीय फिल्म इंडस्ट्री वाईट अवस्थेत होती. मात्र यावर्षी जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यात सिनेमांनी वेगळीच स्पीड पकडली.'

ट्रेड अॅनालिस्ट अतुल मोहन यांच्यानुसार, '२८ जुलै रोजी रिलीज झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमापासून ही सुरुवात झाली. सिनेमाने बॉक्सऑफिसवर  १५० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला. यानंतर ११ ऑगस्ट रोजी गदर २ आला. सनी देओलच्या गदरने तर ५०० कोटी पार केले. तर त्याच दिवशी रिलीज झालेल्या OMG 2 ने 135 कोटींचा धंदा केला. ड्रीम गर्ल २, जवानही चांगली कमाई करतोय.'

एकंदर अॅनालिसिस बघता बॉलिवूडने या तीनच महिन्यात बक्कळ कमाई केली आहे. यापुढचे तीन महिनेही जबरदस्तच असणार आहेत. कारण आगामी ४ मोठ्या चित्रपटांवर लक्ष असणार आहे. अक्षय कुमारचा 'मिशन रानीगंज','रणबीर कपूरचा 'अॅनिमल', शाहरुख खानचा 'डंकी' यामुळे २०२३ तर पूर्णच पॅक आहे.

टॅग्स :सिनेमासनी देओलशाहरुख खानरणबीर कपूरसलमान खान