Join us

भारतीय चित्रपटांची ‘आॅस्कर’वारी

By admin | Published: February 29, 2016 2:21 AM

सध्या आॅस्कर अवॉर्डचे वारे जोरात वाहत आहेत. या शानदार समारंभाला लवकरच सुरुवात होणार आहे. भारतीयांनाही नेहमीच आॅस्करचे आकर्षण राहिले आहे. भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’च्या तुलनेचे आहेत

सध्या आॅस्कर अवॉर्डचे वारे जोरात वाहत आहेत. या शानदार समारंभाला लवकरच सुरुवात होणार आहे. भारतीयांनाही नेहमीच आॅस्करचे आकर्षण राहिले आहे. भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’च्या तुलनेचे आहेत आणि त्यांना तो मिळायला हवा, असा भारतीयांचा दावा आजही कायम आहे. १९५७ पासून भारतातून आॅस्करसाठी चित्रपट पाठवायला सुरुवात झाली. मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया’ आॅस्करवारी करणारा पहिला चित्रपट होता. तीन चित्रपटांना उत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी नामांकन मिळाले होते. यामध्ये ‘मदर इंडिया’, ‘सलाम बॉम्बे’ आणि ‘लगान’ यांचा समावेश होता. आॅस्करसाठी भारताकडून पाठविण्यात आलेल्या चित्रपटांची ही खास माहिती.

मदर इंडियानर्गिस दत्त आणि सुनील दत्त यांचा हा चित्रपट. भारतीय महिलेच्या संघर्षाची ही कहाणी आहे. या चित्रपटाची कथा फारच दमदार होती. म्हणूनच त्याला आॅस्करसाठी नामांकित करण्यात आले. या चित्रपटाच्या सेटवर लागलेल्या आगीतून नर्गिस यांना सुनील दत्त यांनी वाचविले आणि नंतरचा इतिहास आपणास माहिती आहे.

सलाम बॉम्बेआयुष्यातील संघर्ष आणि सत्य यांची ओळख करून देणारा हा चित्रपट त्या काळी खूप गाजला. मुंबईच्या रस्त्यावर घडणाऱ्या घटनांचे वास्तव चित्रण यात करण्यात आले होते. मीरा नायर यांनी मुंबईचे जीवन या चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडले आणि प्रेक्षकांचे काळीज हेलावले.

बँडिट क्विनडाकू फुलन देवी हिच्यावर आधारित हा चित्रपट होता. सातत्याने अत्याचार झाल्याने त्रासलेली फुलन जेव्हा डाकू बनते आणि आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेते, असे याचे कथानक होते. सीमा विश्वासने यात खूप छान भूमिका केली. यालाही आॅस्करचे नामांकन मिळाले होते.

हे रामदाक्षिणात्य हिरो कमल हसनने लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून या चित्रपटाद्वारे आपल्या प्रतिभेची एक वेगळी छाप सोडली. नथुराम गोडसेने महात्मा गांधींची कशी हत्या केली, त्यावर आधारित हा चित्रपट आहे.

बर्फीशारीरिक व्यंग असणाऱ्या मुलामुलींच्या प्रेमाची ही कथा. हा चित्रपट भारतीयांना खूप आवडला. रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा यांनी सुंदर अभिनय केलेला हा चित्रपट होता. बर्फी हा नात्यांची साधी कथा असणारा चित्रपट अनेकांना भावला.

श्वासअतिशय भावनाप्रधान असा हा मराठी चित्रपट. खेड्यातील आजोबा आपल्या ८ वर्षीय नातवाच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी शहरात जातो. या दरम्यान, त्यांच्या आयुष्यात कशा घटना घडतात, याचे फारच भावुक करणारे चित्रण या चित्रपटात केले होते. उत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता.

लगानक्रिकेट हा भारतीयांचा आवडता खेळ आहे, हे ओळखून काढलेला हा चित्रपट आपल्या वेगळया कथेसाठी खूप गाजला. आमीर खान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण देशाचे हृदय जिंकून घेतले होते. आमीर खानला बॉलीवूडमधील करिअरच्या सर्वोच्च स्थानावर नेणारा हा चित्रपट ठरला.

कोर्टदेशाच्या न्यायव्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट अजूनही गाजत आहे. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल गाजविले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळविले. दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी कोर्टाचे जग या चित्रपटाद्वारे दाखविले.