Join us

OMG! पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलालला कुटुंबीयांकडून सक्त ताकीद, वाचा काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 1:43 PM

Pawandeep Rajan and Arunita Kanjilal : ‘इंडियन आयडल 12’ सुरू असताना पवनदीप व अरूणिताच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. आता शो संपल्यानंतरही ही चर्चा संपण्याचं नाव नाही.

ठळक मुद्दे पवनदीप व अरूणिताचे ‘मंजूर दिल’ हे गाणं लवरकच प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. नुकताच याचा टीझर नुकताच रिलीज झाला  होता.

‘इंडियन आयडल 12’चा (Indian Idol 12) विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan )आणि शोची उपविजेती अरुणिता कांजीलाल (Arunita Kanjilal ) सध्या जाम चर्चेत आहेत. शो सुरू असताना पवनदीप व अरूणिताच्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली होती. आता शो संपल्यानंतरही ही चर्चा संपण्याचं नाव नाही. दोघेही अनेकदा एकत्र दिसतात. एकामागून एक म्युझिक व्हिडीओ आणि या व्हिडीओतील दोघांचा ‘रोमान्स’ही चर्चेत आहे. मध्यंतरी तर पवनदीप आणि अरूणिताने लग्न केल्याची चर्चा पसरली होती. अर्थात दोघांनीही ही निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत, यापलीकडे आमच्यात काहीही नाही, असं दोघांनीही अनेक मुलाखतीत याआधीही सांगायचं आहे. पण त्यांच्या चाहत्यांना कोण सांगणार? दोघांचीही जोडी कायम राहावी, ही चाहत्यांची इच्छा आहे आणि चाहत्यांची ही इच्छा बघता प्रोफेशनल लेव्हलवर ती ‘कॅश’ केली जातेय. मात्र आता कुटुंबीयांकडून पवनदीप व अरूणिताला कडक शब्दांत तंबी देण्यात आली आहे.

होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, पवनदीप आणि अरूणिताच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर दोघांचेही कुटुंबीय नाराज आहेत. याच नाराजीतून   कुटुंबीयांनी दोघांनाही कठोर शब्दांत समज दिल्याचे कळतेय. गायनावर लक्ष केंद्रीत करा, पर्सनल लाईफवर नाही, असं कुटुंबीयांकडून दोघांनाही बजावण्यात आलं आहे.आता कुटुंबीयांच्या या कठोर सूचनेनंतर पवनदीप व अरूणिता यांच्या पर्सनल लाईफमध्ये किती आणि कशी बदलणार, हे येत्या काळात दिसेलच.तूर्तास पवनदीप व अरूणिताचे ‘मंजूर दिल’ हे गाणं लवरकच प्रेक्षकांच्या भेटीस येतंय. नुकताच याचा टीझर नुकताच रिलीज झाला  होता. या गाण्यातही पवनदीप व अरूणिताची रोमॅन्टिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. उद्या 23 ऑक्टोबरला हे गाणं रिलीज होत आहे. 

टॅग्स :इंडियन आयडॉल