Join us

बिग बींसोबत KBC च्या हॉट सीटवर इंडियन आयडॉल गर्ल अरुणिता कांजीलाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 2:19 PM

पवनदीप आणि अरुणीता ही यंदाच्या इंडियन आयडॉल सीझनची लोकप्रिय जोडी आहे. आपल्या गाण्यांमधून आणि आवाजाच्या जादूने त्यांनी मोठा फॅन फॉलोविंग तयार केला आहे.

नवी दिल्ली : बिग बी अमिताभ बच्चन यांच्या निवेदनातील कौन बनेगा करोडपती म्हणजे KBC मध्ये टॅलेंटच्या जोरावर सहभागी होता येते. तर, अनेकदा सेलिब्रिटींनाही या खेळात संधी मिळते. क्रिकेटर्स, बॉलिवूडचे कलाकार किंवा सामाजिक कार्यात आपले वेगळेपण उमटवणारे चेहरेही येथे हॉट सीटवर पाहायला मिळतात. आता, नुकतेच इंडियन आयडॉल 12 चे विजेते ठरलेल्या पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांना या शोमध्ये पाहता येईल. 

पवनदीप आणि अरुणीता ही यंदाच्या इंडियन आयडॉल सीझनची लोकप्रिय जोडी आहे. आपल्या गाण्यांमधून आणि आवाजाच्या जादूने त्यांनी मोठा फॅन फॉलोविंग तयार केला आहे. त्यातच, इंडियन आयडॉल 12 चे विजेतेपद मिळवल्याने आणि रनरअप असल्याने पवनदीप आणि अरुणिता हे चांगलेच फेमस झाले असून त्यांना मोठ्या संधीही मिळत आहेत. चित्रपटांत प्लेबॅग सिंगिगच्या ऑफर्सही त्यांना मिळत असून बॉलिवूडची दारं त्यांच्यासाठी खुली झाली आहेत. 

अरुणिता आता लवकरच कौन बनेगा करोडपतीच्या गेम शोमध्ये बिग बी अमिताभ यांच्यासमोर हॉटसीटवर बसणार आहे. अरुणिताचा भाऊ अनीषने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतरच लोकांनी अंदाज लावला आहे की, अरुणिता लवकरच हॉट सीटवर दिसणार आहे. विशेष म्हणजे केवळ अरुणिताच नाही, तर पनदीपसह टॉप 6 इंडियन आयडॉल रनरअप बिग बींसोबत झळकणार आहेत. दरम्यान, अरुणिताच्या फोटोसह अनीषने कॅप्शन दिलं आहे, आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी हा एक.. असे त्याने म्हटले आहे. त्यामुळे, अरुणिताला अमिताभ यांच्यासमवेत पाहायची आता तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.  

केबीसीत सहभागी झाल्याने रेल्वे कर्मचाऱ्यावर कारवाई

कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झालेल्या रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याला खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोटा विभागातील कार्यालय अधीक्षक देशबंधू पांडे यांच्यावर रेल्वे प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. त्यांना चार्जशीट पाठवण्यात आली आहे. याशिवाय ३ वर्षांसाठी त्यांची पगारवाढ थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनानं केलेल्या कारवाईला कर्मचारी संघटनेनं विरोध केला आहे. पांडे यांच्याविरुद्ध झालेली कारवाई अयोग्य असल्याचं पश्चिम मध्य रेल्वे मजूर संघाचे सचिव अब्दुल खालिद यांनी म्हटलं आहे. मजूर संघ पांडेवर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देईल, असंही खालिद म्हणाले.

टॅग्स :इंडियन आयडॉलअमिताभ बच्चनकौन बनेगा करोडपती