Join us

इंडियन आयडल कार्यक्रमातील या स्पर्धकाचा आवाज ऐकून परीक्षक झाले थक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:59 PM

ऑडिशनच्या टप्प्यात देशाच्या काना-कोपर्‍यातून आलेल्या अद्भुत गायकांनी आपल्या मधुर आवाजाने परीक्षकांना चकित केले. त्यातील काही या मंचाचे ऋणी झाले तर काहींना त्यांच्यात सुधारणा करण्यास या कार्यक्रमातील परीक्षकांनी मार्गदर्शन दिले. यातील काही प्रतिभावंत स्पर्धक असे होते, ज्यांना केवळ कौतुकच मिळाले नाही तर परीक्षकांच्या हृदयात विशेष स्थान देखील मिळाले.

सोनी वाहिनीवरील इंडियन आयडलचे आजवरचे अनेक सिझन हिट ठरले आहेत. या कार्यक्रमाने आजवर एकापेक्षा एक गुणी गायक बॉलिवूड इंडस्ट्रीला मिळून दिले आहेत. आज हे गायक बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण करत आहेत. या कार्यक्रमाचा नवा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. देशातील सर्वात मोठा गायनाचा रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉलकडे पाहिले जाते. या कार्यक्रमाचा दहावा सिझन देखील प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. या कार्यक्रमाने भारताला प्रतिभावंत गायक दिले असून यंदाचा सिझन देखील आजवरच्या इतर सिझनसारखा दमदार ठरत आहे.देशाला उत्तमोत्तम गायक मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेला हा कार्यक्रम यंदा केवळ प्रतिभावान स्पर्धकांमुळेच नाही तर त्यांच्या अचंबित करणार्‍या प्रेरक कथांमुळे देखील चर्चेत आला आहे. तरुण नवोदित गायकांना पारखून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखला जाणारा हा मंच देशभरातील उत्तम गायकांची निवड करून आता सज्ज झाला आहे.ऑडिशनच्या टप्प्यात देशाच्या काना-कोपर्‍यातून आलेल्या अद्भुत गायकांनी आपल्या मधुर आवाजाने परीक्षकांना चकित केले. त्यातील काही या मंचाचे ऋणी झाले तर काहींना त्यांच्यात सुधारणा करण्यास या कार्यक्रमातील परीक्षकांनी मार्गदर्शन दिले. यातील काही प्रतिभावंत स्पर्धक असे होते, ज्यांना केवळ कौतुकच मिळाले नाही तर परीक्षकांच्या हृदयात विशेष स्थान देखील मिळाले. अशीच एक गुणी कलाकार होती केरळची लक्ष्मी जयन. तिने प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आपल्या मधुर आवाजाने आश्चर्यचकित तर केलेच पण ‘ऊह ला ला’ हे गाणे स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही आवाजात म्हणून सर्वांना थक्क करून सोडले. लक्ष्मीचे गाणे इतके प्रभावी होते की, परीक्षक नेहा कक्कडने उभे राहून तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. याविषयी लक्ष्मी सांगते, “परीक्षकांकडून कौतुक मिळाल्याने खूप धन्यता वाटते. नेहा मॅडम, अन्नू मलिक सर आणि विशाल दादलानी यांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि इतक्या छान टिप्पण्या दिल्या, त्याने मी भारावून गेले. माझे स्वप्नच जणू सत्य झाले आहे. मी खूप उत्साहित आहे आणि आता बघूया भविष्यात काय आहे ते?” 

टॅग्स :इंडियन आयडॉलनेहा कक्करविशाल ददलानी