Join us

भारतीय गायकांच्या स्वरांनी निनादल्या दाही दिशा !

By admin | Updated: March 26, 2016 02:36 IST

नागपूरचे इन्डोअर स्टेडियम...,वेळ : मावळतीची...श्रोत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला...मंचावरच्या विविधरंगी प्रकाशझोतात एक अस्पष्ट प्रतिमा दिसायला लागली...अन् एकच

स्थळ : नागपूरचे इन्डोअर स्टेडियम...,वेळ : मावळतीची...श्रोत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला...मंचावरच्या विविधरंगी प्रकाशझोतात एक अस्पष्ट प्रतिमा दिसायला लागली...अन् एकच गलका झाला...केके आला...गोड गळयाच्या या गायकाने चौफेर एक नजर टाकली आणि आपल्या अविट स्वरांनी उपस्थित तमाम नागपूरकरांना जिंकून घेतले. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्षा आणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त आयोजित ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ वितरणाचे. नागपुरात केकेला श्रोत्यांचे अपार प्रेम मिळाले. पण, केकेची ही प्रसिद्धी पताका एकएकटे नागपूर नाही तर जगभर अशी दिमाखात फडकतच असते. लाईव्ह इन कॉन्सर्ट या गायकांना मिळालेल्या हक्काच्या मंचाने अनेक टॅलेंटेड सिंगर्सला अशी तेजस्वी ओळख मिळवून दिली आहे. अरजित सिंग, मिक्का सिंग, सोनू निगम, शान हे ते भारतीय स्टार सिंगर्स आहेत ज्यांच्या लाईव्ह इन कन्सर्टने त्यांना जगभर ओळख मिळवून दिली आहे. त्यांच्या या थक्क करणाऱ्या प्रवासावर एक नजर... के केदुसऱ्या वर्गात असताना केकेने संगीत क्षेत्राकडे गंभीरपणे पाहण्यास सुरुवात केली़ तोपर्यंत आईचे मल्याळम गाणी ऐकायचे आणि हौसेपोटी गायचे एवढेच केके करायचा़ १९७३ मध्ये राजा राणी या चित्रपटातील ‘जब अंधेरा होता है़़’ या चित्रपटाद्वारे केकेचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला़ ‘तडप तडप के इस दिल से’ या हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील गाण्याने त्याला नवी ओळख दिली़ पुढे तो लाईव्ह कॉन्सट करायला लागला आणि त्याचे स्वर सातासमुद्रापार पोहोचले. मनाला हळवी करणारी गंभीर गाणी ही केकेची ओळख असली तरी सगळ्याप्रकारची गाणीही अगदी सुंदर गातो आणि हेच केकेच्या लाईव्ह कॉन्सर्टचे वैशिष्ट आहे. म्हणूनच केके आज संगीतप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनला आहे़सोनू निगमदिल्लीच्या बर्थडे पार्टीत गाण्यापासून बॉलिवूडमधील एक यशस्वी पार्श्वगायक हा टप्पा पार करण्यासाठी सोनू निगम याने अपार संघर्ष केला़ १८ व्या वर्षी सोनूने ‘आजा मेरी जान’ या चित्रपटासाठी पहिले गाणे गायले़, पण दुर्दैव म्हणजे हा चित्रपट रिलीज झालाच नाही़ यानंतर मात्र सनम बेवफा या चित्रपटातील ‘अच्छा सिला दिया तुने’ या गाण्याने सोनूला ओळख दिली़ आज सोनू सर्वात डिमांडिग लाईव्ह कॉन्सर्ट सिंगर आहे़मिका सिंगसिंगर, कम्पोझर, परफॉर्मर, साँग राईटर अशी मिका सिंह याची ओळख आहे़ अमरिक सिंग असे मिकाचे खरे नाव़ २००६मध्ये राखी सावंतला किस केल्सामुळेच मिका सर्वाधिक गाजला़ पॉप सिंगर, रॅपर असलेल्या मिका सिंह याने काही बंगाली गाण्यांनाही आवाज दिला आहे़ मिका सिंहच्या पंजाबी गाण्यांमुळे त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये वेगळेच रंग भरले जातात़ मिकाला लाईव्ह ऐकणे म्हणजे धम्माल असते नुसती़ त्यामुळे त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टचे बोर्डवर हाऊसफूल लिहिलेले दिसते.अरिजीत सिंहशास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेला अरिजीत सिंह शास्त्रीय गायक होता होता बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रीय पार्श्वगायक बनला़ फेम गुरुकुल या रिअ‍ॅलिटी शो मधून नावारूपास आलेल्या अरिजीतने आशिकी २ साठी गायलेल्या तुम ही हो या गाण्याने अरिजीत एका रात्रीत स्टार झाला या गाण्यासाठी फिल्मफेअर जिंकल्यानंतर तर अरिजीत प्रसिद्धीच्या शीखरावर जावून बसला़ अरिजीतचे लाईव्ह कॉन्सर्ट नेहमीच गाजत असतात. देशविदेशात कॉन्सर्ट स्टार म्हणून त्याला मोठी डिमांड आहे़