साऊथ सिनेमे देशभरात सुपरहिट होण्याचा सिलसिला सुरू झाला त्यात 'केजीएफ' (KGF) सिनेमाचा मोलाचा वाटा आहे. या सिनेमातील रॉकी भाईच्या भूमिकेतून अभिनेता यशला मोठी लोकप्रियता मिळाली. या सिनेमाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्सही कायम केले होते. या सिनेमात रॉकीभाई सोबतच आणखी भूमिका सर्वात जास्त गाजली होती. ती म्हणजे व्हिलनची. खतरनाक लूकने गरूडाने (KGF Garuda) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. गरूडाची भूमिका रामचंद्र राजूने साकारली होती. पण अनेकांना माहीत नाही की, तो मूळचा अभिनेता नाही तो एक बॉडीगार्ड होता.
केजीएफचा व्हिलन राजू
साउथचा स्टार यशचा 'केजीएफ चॅप्टर २' (K.G.F Chapter 2) सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाबाबत प्रेक्षकांमध्ये खूपआधीपासून उत्सुकता आहे आणि सिनेमाच्या पहिल्या पार्टमधील गरूडा सर्वांनाच आठवत आहे. गरूडा म्हणजे रामचंद्र राजूने २०१८ मध्ये 'केजीएफ' सिनेमातून आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरूवात केली. पहिल्याच
सिनेमात त्याने व्हिलनची भूमिका इतकी दमदार साकारली की आजही तो लोकांच्या लक्षात आहे.तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, रामचंद्र राजू अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. रामचंद्र हा दुसऱ्या कुणाचा नाही तर केजीएफ स्टार यशचा बॉडीगार्ड होता. रामचंद्रचा परफॉर्मन्स पाहून कुणीही हे म्हणू शकत नाही की, हा त्याचा पहिला सिनेमा आहे. इतका दमदार अभिनय त्याने केला होता.
यशसोबत राजूचं कास्टिंग
राम चंद्र राजू (Ram Chandra Raju) ने कधीही विचार केला नसेल की तो सिनेमात काम करेल. पण सत्य कधी कधी स्वप्नापेक्षा भारी असतं. सिनेमात काम मिळणं हाही एक योगायोगच होता. केजीएफचे रायटर स्क्रिप्ट डिस्कस करण्यासाठी यशकडे गेले होते. त्यांनी राम चंद्रला तिथे पाहिलं. त्याला बघताच मेकर्सनी त्याला गरूडाची भूमिका ऑफर केली. रायटरने त्याला एकदा ऑडिशन देण्यास सांगितलं आणि भूमिका त्याला मिळाली.