'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Aamchi Collector) या मालिकेत एक नवा अध्याय सुरु झाला आहे. मालिकेने अलिकडेच सात वर्षांची लीप घेतली आहे. अप्पी आणि अर्जुन दोघेही सात वर्षे आपल्या जीवनात वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियतीने त्यांना परत एकत्र आणले आहे. दरम्यान मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचे नाते फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तशी त्या दोघांची मैत्री ही मजबूत होताना दिसत आहे.
अमोलशी बोलल्याने अर्जुनच्या मनातील कडवटपणा कमी होऊ लागलाय आणि तो अप्पीला एक संधी देण्याचे ठरवतो. त्यासाठी अर्जुन अप्पीच्या घरी भेटीला गेला असता त्याला तिकडे आलेले सरकार आणि रुक्मिणी दिसतात आणि त्याची तळपायाची आग मस्तकात जाते, अप्पी अजूनही तशीच आही हे कळताच तो मागे फिरतो.
इकडे अमोलचा वाढदिवस जवळ आला आहे आणि अप्पीची इच्छा आहे की अर्जुनला अमोलच्या वाढदिवसाला बोलवावे. ती त्यासाठी तयारी करते आणि गायतोंडेला अर्जुनची माहिती काढायला सांगते. अर्जुन आणि अमोलची मैत्री वाढत चालली आहे. अमोल आईने दिलेला डब्बा अर्जुनला खायला लावतोय आणि स्वतः आवडीचे चायनीज,पिझ्झा आणि बर्गर खातो. अर्जुन त्याचे सगळे लाड पुरवतोय. अमोलच्या वाढदिवसादिवशी मात्र अप्पी अमोलला त्याच्या बाबाबद्दल सगळं सांगते, तो कसा होता? त्यांचे नाते कस होत ? पण अप्पी, अमोलला वाढदिवसाला अर्जुनच त्याचा बाबा आहे हे सांगू शकेल ? हे जाणून घेण्यासाठी 'अप्पी आमची कलेक्टर' मालिका पाहावी लागेल.