प्रियांका चोप्रा अलीकडेच न्यूयॉर्कवरून भारतात परतली. येथे पीसी आपल्या लग्नाची तयारी पूर्ण करणार आहे. पुढील महिन्यात प्रियांका व अमेरिकन सिंगर निक जोनास लग्नबंधनात अडकणार आहेत. या कपलच्या लग्नामुळे केवळ त्यांचे कुटुंबीयचं नाही तर चाहतेही उत्साहात आहेत. याचमुळे सोशल मीडियावर हा हॅशटॅग ट्रेंड करू लागला आहे. अशात पीसी व निकच्या लग्नाचा पहिला फोटो पाहण्यास चाहते किती उत्सूक असतील, याचा अंदाज आपण लावू शकतो. पण या चाहत्यांना निराश करणारी एक बातमी आहे. होय, बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियांका व निक यांच्या लग्नाचे फोटो सर्वप्रथम एका इंटरनॅशनल मॅगझिनमध्ये छापले जाणार आहेत. एका सुप्रसिद्ध इंटरनॅशनल मॅगझिनने आपल्या कव्हरपेजसाठी प्रियांका व निकच्या लग्नाचे खास फोटो मिळवण्यासाठी नाही-नाही ते प्रयत्न चालवले आहेत. यासाठी हे मॅगझिन वाट्टेल ती किंमत मोजायलाही तयार आहे. यापूर्वी वोग इंडिया या मॅगझिनने सोनम कपूर व आनंद अहुजा यांच्या लग्नाचे फोटो आपल्या कव्हरपेजवर छापले होते. या शाही लग्नात प्रियांका फॅशन डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसणार आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निकने संगीत सेरेमनीसाठी खास प्लान तयार केला आहे. येत्या ३० नोव्हेंबरला हा संगीतसोहळा होणार आहे. या संगीत सेरेमनीत निक आणि पीसी दोघेही परफॉर्म करणार आहे. निक तर खास आपल्या ट्रूपसोबत परफॉर्म करणार आहे. त्याचा हा परफॉर्मन्स ४५ मिनिटांचा असेल. यात तो प्रियांकासाठी लव्ह सॉन्ग गाताना दिसेल.निक आणि प्रियांका एकदा नाही तर दोनदा लग्न करणार, असेही करतेय. अमेरिकन आणि भारतीय अशा दोन्ही पद्धतीने हे लग्न होणार आहे. ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत जोधपूरमध्ये हा विवाह सोहळा हेणार आहे. अर्थात याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण हे लग्न शाही होणार, यात शंका नाही.