शाहरुख खानचा क्लासिक 'देवदास' सिनेमा आजही सर्वांचा फेव्हरेट. शाहरुख खान-माधुरी दीक्षित-ऐश्वर्या राय बच्चन यांची अनोखी केमिस्ट्री आणि जुन्या विषयाला दिलेली नवी ट्रीटमेंट अशा अनेक गोष्टींमुळे 'देवदास' प्रचंड गाजला. IMDB वरही लोकांचा फेव्हरेट सिनेमा असून 7.5/10 हे रेटिंग या सिनेमाला आहे. २००२ साली रिलीज झालेल्या 'देवदास'ला आज २२ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने जाणून घ्या 'देवदास'मधील अशा गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहित नसतील.
'देवदास' बद्दलच्या माहित नसलेल्या या ५ गोष्टी जाणून घ्या
१. शाहरुखचा 'देवदास' हा हिंदीत बनलेला तिसरा सिनेमा आहे. प्रथम के.एल. सैगल यांनी (1936) नंतर दिलीप कुमार (1955) यांनी देवदासची भूमिका साकारली. तिसऱ्यांदा शाहरुखने २००२ साली 'देवदास' साकारला.
२. 'काहे छेड मोहे' या गाण्यात माधुरी दीक्षितने परिधान केलेल्या पोशाखाचे वजन ३० किलो होते. इतका जड पोशाख परिधान करताना माधुरीला डान्समध्ये खूप अडचणी आल्या. पण तरीही तिने सर्व अडचणींवर मात करत यशस्वीपणे नृत्य पूर्ण केले.
३. 'देवदास' हा पहिला व्यावसायिक बॉलिवूड सिनेमा आहे ज्याला मानाच्या आंतरराष्ट्रीय कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आमंत्रण मिळाले आहे.
४. श्रेया घोषालने तिच्या संगीत कारकिर्दीत 'देवदास'निमित्ताने पहिले बॉलीवूड गाणे 'बैरी पिया' अवघ्या १६ वर्षांची असताना रेकॉर्ड केले होते. तिने संपूर्ण गाणे एका टेकमध्ये रेकॉर्ड केले.
५. ‘डोला रे’ गाण्याच्या शूटिंगच्या वेळी ऐश्वर्या राय बच्चनच्या कानात जड झुमक्यांमुळे रक्तस्त्राव झाला होता. वेदना होत असूनही ऐश्वर्याने तिचा अभिनय चोख पार पडला.
'देवदास'ची २२ वर्ष पूर्ण
'देवदास' सिनेमाला २२ वर्ष पूर्ण झाल्याने भन्साळी प्रोडक्शन्सच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलने खास कॅप्शनसह सिनेमाचा एक नॉस्टॅल्जिक व्हिडिओ मेमरी शेअर केलीय. "देवदासची जादू अजूनही जिवंत आहे. आपल्या हृदयाचा भाग बनलेल्या प्रेमाची, मैत्रीची आणि सुरांची २२ वर्षे साजरी करत आहोत #22YearsOfDevdas" या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट करत 'देवदास'ची आठवण जागवली आहे.