Join us

Intresting...! पूजा सावंतने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले नसले तर या क्षेत्रात आजमावले असते नशीब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 18:47 IST

अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रीय आहे.

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. पूजा सावंतने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. एका मुलाखतीत पूजाने लोकमतशी बोलताना ती जर या क्षेत्रात आली नसती तर ती प्राण्यांची डॉक्टर झाली असती, असे सांगितले.

खरेतर सर्वांनाच माहित आहे की पूजाचे निसर्ग व प्राण्यांवर किती प्रेम आहे. तिच्या घरातही तिने बरेच प्राणी पाळले आहेत. तसेच ती प्राण्यांचे रेस्क्यूदेखील करते. त्यामुळेच कदाचित तिला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे असेल. याबाबत सांगताना पूजा म्हणाली की, मला प्राण्यांचे डॉक्टर व्हायचे होते. मनात कल्चरलमध्ये काहीतरी करेन असे होते. पण नशीबात मी अभिनेत्री होणार असेल म्हणून या क्षेत्रात आले.

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच पूजाने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे.

'जंगली' सिनेमात तिने शंकराची भूमिका बजावली असून ती महिला माहूत आहे. तिच्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

इतकेच नाही तर तिच्या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतूक झाले होते.

टॅग्स :पूजा सावंतजंगली