Join us

बनियनवर आलेल्या नुपूरला पाहून आयरा खानने दिली प्रतिक्रिया, सासूलाही आवरलं नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 14:16 IST

आयरा खान आणि नुपूर शिखारे यांनी कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने सह्या करत लग्न केले.

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानची (Aamir Khan)  लेक आयरा खान (Ira Khan) काल लग्नबंधनात अडकली. मुंबईतील हॉटेल ताज लँड्स एंड येथे तिने फिटनेस ट्रेनर नुपूर शिखारेसह रजिस्टर मॅरेज केलं. यावेळी नुपूर चक्क बनियनवर आठ किलोमीटर पळत लग्नस्थळी पोहोचला होता. त्यांच्या या अजब वरातीला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. नवरा बनियनवर आला असल्याचं पाहून आयरा खानने काय म्हणाली पाहा. 

आयरा खान आणि नुपूर शिखारे यांनी कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या साक्षीने सह्या करत लग्न केले. यानंतर स्टेजवर नुपूर आणि आयराचं संपूर्ण कुटुंब होतं. तेव्हा आयरा माईकवर म्हणते,'आता तो अंघोळीला जाणार आहे. गुडबाय!' आयराची ही प्रतिक्रिया ऐकताच सगळेच हसायला लागतात. यावेळी नुपूरची आई म्हणजेच आयराची सासूही स्टेजवर असते. तिला हे ऐकून खळखळून हसायला आलं.'

आयरा आणि नुपूरच्या या अनोख्या लग्नाची चर्चा सगळीकडेच चर्चा सगळीकडेच झाली. आयराने लग्नात पटियाला आणि ब्लाऊज घातला होता. तर डोक्यावरुन गोल्डन रंगाची ओढणी घेतली होती. आयराचा ड्रेसिंग सेन्सही नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही. सोशल मीडियावर आमिरच्या कुटुंबाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

टॅग्स :इरा खानआमिर खानबॉलिवूडलग्न