न्यूरो एंडोक्राइन ट्युमरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असलेला अभिनेता इरफान खानच्या पुनरागमनाकडे चाहते डोळे लावून बसले असताना लवकरच इरफानच्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. होय, इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा सिनेमा येत्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. तत्पूर्वी आज या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. इरफानचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाच्या ट्रेलरकडे डोळे लावून बसले होते. ट्रेलरमध्ये इरफान खान पुन्हा एकदा आपल्या अभिनयाने मन जिंकतो. मुलीच्या परदेशातील शिक्षण घेण्याच्या स्वप्नासाठी झटणाºया बापाची भूमिका साकारताना त्याचा नैसर्गिक अभिनय मनाला भिडतो.
ट्रेलरच्या सुरुवातीला इरफान खान त्याच्या मुलीच्या शाळेत भाषण देताना दिसत आहे. त्यानंतर त्याची मुलगी त्याला परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवते. मात्र या यासाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्न उभा ठाकतो. पण प्रसंगी स्वत:चे रक्त विकून तुझ्या फीचा पैसा उभा करेन, असे आश्वासन इरफान मुलीला जातो. 3 कोटीची रक्कम उभी करताना एका बापाच्या मार्गात काय काय अडचणी येतात, त्याचीच एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. हा ट्रेलर तुम्हाला हसवतो, विचार करायला लावतो. काही प्रसंगी डोळ्यात पाणीही आणतो आणि पुन्हा हसवण्यात यशस्वी ठरतो. इरफानचा ‘अंग्रेजी मीडियम’ येत्या 20 मार्चला रिलीज होतोय. ‘अंग्रेजी मीडियम’या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्याआधी इरफान खानने एक भावूक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने प्रकृतीच्या कारणाने सिनेमाच्या प्रमोशनला उपस्थित राहता येणार नसल्याची खंत व्यक्त केली होती.
व्हिडीओ शेअर करत दिला होता भावूक मॅसेज
‘मै आज आपके साथ हूँ भी और नहीं भी.. ये फिल्म अंग्रेजी मीडियम बहुत खास है. सच, यकीन मानिए, मेरी दिल की ख्वाहिश थी की इस फिल्म को उतने ही प्यार से प्रमोट करू जितने प्यार से हम लोगोंने बनाया है. लेकिन, मेरे शरीर के अंदर कुछ अनवाँटेड मेहमान बैठे हुए है उनसे वातार्लाप चल रहा है. देखते है किस करवट उठ बैठता है. बोलने मै अच्छा लगता है पर सच मै जब जिंदगी आपके हाथ मै निंबू थमाती है ना, तो शिकंजी बनाना बहुत मुश्किल हो जाता है. लेकिन आपके पास और चॉईस भी क्या है पॉझिटिव्ह रहने के अलावा? इन हालात मै निंबू की शिकंजी बना पाते है की नाही बना पाते है, ये आप पर है. पर हम सबने इस फिल्म को उसी पॉझिटिव्हिटी के साथ बनाया है. पर मुझे उम्मीद है की ये फिल्म आपको सिखाएगी, हसाएगी, रुलाएगी, फिर हसाएगी शायद....असे इरफान व्हिडीओत म्हणतोय.