Join us

राजेश खन्नाच्या बंगल्यावर एकदा एसी रिपेअर करायला गेला होता इरफान खान, वाचा काय आहे किस्सा....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 8:00 AM

Irrfan Khan birth anniversary: : बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा इरफान आज आपल्यात असता तर त्याचा वाढदिवस साजरा करत असता. आज 7 जानेवारीला त्याचा वाढदिवस.

बॉलिवूड दिग्गज अभिनेता इरफान खान आज या जगात नाही. पण त्याला विसरणं शक्य नाही.  अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चं वेगळं असं भक्कम स्थान निर्माण केलं होतं. बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप पाडणारा इरफान आज आपल्यात असता तर त्याचा वाढदिवस साजरा करत असता. आज 7 जानेवारीला त्याचा वाढदिवस.

 इरफानचं खरं नाव साहबजादे इरफान अली खान. पण एवढं लांबलचक नाव सिनेमांत चालणार नाही म्हणून त्याने केवळ इरफान खान हे नाव धारण केलं. मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी त्याने नावात पुन्हा बदल करत, केवळ   इरफान असं नाव धरण केलं होतं.खरं तर इरफानला लहानपणापासून क्रिकेटर व्हायचं होतं. पण तो झाला अभिनेता. त्याआधी काय, तर तो एसी व पंखे दुरूस्त करायचा. होय, अभिनेता होण्यापूर्वी इरफान एकदा राजेश खन्ना यांच्या  घरचा एसी रिपेअर करायला गेला होता.

इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात खुद्द इरफानने हा किस्सा ऐकवला होता. इरफानने जयपूरमध्ये एक टेक्निकल कोर्स केला होता. यानंतर एअर कंडिशनच्या ट्रेनिंगसाठी तो मुंबईत आला होता. त्यावेळी तो मुंबईत लोकांच्या घरी जाऊन त्यांचे एसी रिपेअर करायचा. एकदा तो राजेश खन्ना यांच्या घरी एसी रिपेअर करायला गेला होता.हा किस्सा शेअर करताना तो म्हणाला होता, ‘मला आजही आठवतं, मी राजेश खन्ना यांच्या घरचा एसी रिपेअर केला होता. मोलकणीने दरवाजा उघडला होता आणि तुम्ही कोण असा प्रश्न मला केला होता. यावर, एसीवाला असं मी म्हणालो होतो. मग तिने मला आत घेतलं होतं. मी घरात गेलो. तसा अलिशान बंगला मी पहिल्यांदा पाहिला होता. घरात राजेश खन्ना यांना शोधत माझी नजर भिरभिरत होती. पण कदाचित माझं नशीब वाईट होतं. त्यादिवशी ते घरीच नव्हते.’पुढे तो म्हणाला होता, ‘ मी जयपूरला परतलो आणि माझ्या बाबांनी मला एका व्यक्तिशी ओळख करून दिली. त्याने मला पंख्याच्या दुकानात बसवलं. तिथे मी पंखे दुरूस्त करायचो. 

इरफानचा डेब्यू सिनेमा होता, ‘सलाम बॉम्बे’. मीरा नायर या चित्रपटाची दिग्दर्शक. एका कॉलेज वर्कशॉपमध्ये इरफान व मीरा यांची भेट झाली होती. ‘सलाम बॉम्बे’ची कथा मुंबईच्या रस्त्यांवर राहणा-या मुलांवर आधरित होती. इरफानने या चित्रपटासाठी काही दिवस रस्त्यावर राहणाºया मुंबईच्या मुलांसोबत वर्कशॉपही केला होता. या चित्रपटात इरफानला एका स्ट्रीट किडचा रोल दिला गेला होता. पण अचानक हा रोल त्याच्याकडून काढून घेण्यात आला आणि रस्त्याच्या कडेला बसणाºया लेटर राइटरचा रोल त्याला दिला गेला. इरफान त्या दिवशी रात्रभर रडला होता... 

टॅग्स :इरफान खानबॉलिवूड