बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मुंबईत परतला असून तूर्तास येथील एका रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याचदरम्यान इरफान कामावर परतणार असल्याचेही कळतेय.ताजी बातमी खरी मानाल तर, येत्या २२ तारेखेपासून इरफान कामावर परतणार असून ‘हिंदी मीडियम’च्या सीक्वलचे शूटींग सुरु करणार आहे. कॉस्च्युम डिझाइनर्सनी इरफानच्या आऊटफिटवर काम सुरु केले आहे. अर्थात अद्याप या चित्रपटाची हिरोईन ठरलेली नाही. मध्यंतरी या चित्रपटात इरफानच्या अपोझिट करिना कपूरला कास्ट करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र करिनाने तूर्तास कुठलाही खुलासा केलेला नाही.
लवकरच रूपेरी पडद्यावर परतणार इरफान खान!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 11:56 AM
बॉलिवूड अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मुंबईत परतला आहे.
ठळक मुद्देरफान खान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. गतवर्षी मार्चमध्ये इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता.