Join us

लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 09:03 IST

दिव्यांका त्रिपाठीचा ९ वर्षांचा संसार मोडणार? घटस्फोटाच्या चर्चांवर पती विवेक दहियाने सोडलं मौन

'ये है मोहोब्बते' या मालिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी घराघरात पोहोचली. दिव्यांकाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. दिव्यांका सध्या तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिव्यांका पती विवेक दहियापासूनघटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. लग्नानंतर ९ वर्षांनी दिव्यांका आणि विवेक घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. 

विवेकचा एअरपोर्टवरील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तो एका दुसऱ्या मुलीसोबत दिसला होता. या व्हिडिओमुळेच दिव्यांका आणि विवेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता विवेकने मौन सोडत घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

घटस्फोटाच्या चर्चांवर विवेक दहियाने सोडलं मौन

विवेक म्हणाला, "मला तर खूप हसू आलं. मी आणि दिव्यांका हसत होतो. आम्ही आइसक्रिम खाताना ही न्यूज वाचली. हे फक्त मनोरंजनासाठी केलं आहे बाकी काहीच नाही. मीदेखील युट्यूब व्लॉगिंग करतो. मलाही माहीत आहे की क्लिकबेट कसं करतात. हे बिजनेस मॉडेल मला माहीत आहे. सनसनी थंबनेल दिलं तर लोग क्लिक करतात. व्हिडिओ बघतात. पण, त्यात काहीच नसतं. तुम्हाला जर थंबनेलवरुन त्या गोष्टी खऱ्या वाटत नसतील तर क्लिक करून व्ह्यूज वाढवू नका. हे फेक एंटरटेनमेंट आहे". 

दिव्यांका आणि विवेकने २०१६ मध्ये लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला ९ वर्ष पूर्ण झाली आहेत. 'ये है मोहोब्बते'च्या सेटवर ते एकमेकांना भेटले होते. या मालिकेत दिव्यांका मुख्य भूमिकेत होती. तर विवेकने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीविवेक दहियाघटस्फोटटिव्ही कलाकार