Join us  

यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्रा करते भुतांची पूजा?; अभिनेत्रीने दिलं उत्तर, हसत हसत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 2:53 PM

Priyanka Chopra : यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्राने भुतांची पूजा केली का? असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमी आपल्या अंदाजामुळे चर्चेत असते. लोकप्रिय अभिनेत्री होण्याचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. खूप मेहनत घ्यावी लागली. पण याच दरम्यान देसी गर्लबाबत एक अफवा देखील पसरली आहे. हे सर्व यश मिळवण्यासाठी ती भुतांची पूजा करते असं काही लोकांना वाटतं. याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र आता प्रियंकानेच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. एका पॉडकास्ट मुलाखतीत तिला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा तिने याबाबत खुलासा केला आहे. 

यश मिळवण्यासाठी प्रियंका चोप्राने भुतांची पूजा केली का? असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर ती आधी हसली आणि म्हणाली, "हे खूप भीतीदायक आहे. शिवजी माझ्यावर नाराज होतील." मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर चित्रपटांच्या ऑफर मिळू लागल्या आणि प्रसिद्धी मिळाल्याचं तिने सांगितलं आहे. तसेच करिअरच्या शिखरावर असताना काही लोकांनी मला खूप त्रास दिला, असाही खुलासा तिने या मुलाखतीत केला आहे. 

"माझं करिअर खूप छान चाललं होतं, म्हणून काही लोकांना ते पटलं नाही. मला प्रोजेक्ट्स मिळू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले" असं ती म्हणाली. मात्र यावेळी तिने कोणाचंच नाव घेतलं नाही. प्रियंका हिने आपल्या यशाचं श्रेय पालकांना दिलं आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकांनी साथ दिली. आई वडिलांच्या प्रोत्साहनामुळेच यश संपादन केल्याचं प्रियंकाने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर देशातच नाही तर परदेशातही आपले स्थान निर्माण केले आहे. बऱ्याचदा ती वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपले मत ठामपणे मांडताना दिसते. प्रियंका Russo Brothers' Citadel या चित्रपटात दिसणार आहे, जो Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. फरहान अख्तरच्या 'जी ले जरा'मध्येही प्रियंका दिसणार आहे. त्याच्याशिवाय कतरिना कैफ आणि आलिया भट देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :प्रियंका चोप्राबॉलिवूड