प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) कायम त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत येत असतात. भव्यदिव्य सेट, बिग बजेट सिनेमा, उत्तम कलाकार आणि तितकंच दमदार कथानक हे त्यांच्या सिनेमांचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांचा सिनेमा येणार म्हटल्यावर प्रेक्षक रिलीज डेटकडे डोळे लावून बसले असतात. इतकंच कशाला त्यांच्या सिनेमात काम करण्यासाठी कलाकार मंडळी सुद्धा उत्सुक असतात. सध्या संजय लीला भन्साळी त्यांच्या 'इन्शाअल्लाह' या त्यांच्या अपकमिंग सिनेमामुळे चर्चेत येत आहेत. या सिनेमात अभिनेता सलमान खान (Salman khan) मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, आता हा सिनेमाने शाहरुखच्या(shahrukh khan) पदरात पडल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या संजय लीला भन्साळी त्यांच्या 'इन्शाअल्लाह' या सिनेमाची तयारी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते या सिनेमावर काम करत आहेत. पिंकव्हिलाच्या माहितीनुसार, येत्या मे किंवा जून महिन्यात हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाचं पोस्ट प्रोडक्शनचं काम पूर्ण झालं असून सध्या या सिनेमासाठी स्टारकास्टचा शोध सुरु आहेत. विशेष म्हणजे या सिनेमाची घोषणा झाल्यापासून यात सलमान खानची वर्णी लागणार असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, ऐनवेळी आता त्याच्या जागी शाहरुखच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे किंग खानने पठाणच्या हातून हा सिनेमा हिसकावून घेतला की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमानंतर सलमान इंशाअल्लाह या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा भन्साळींसोबत काम करणार होता. परंतु, सलमान आणि भन्साळींमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे सलमानऐवजी भन्साळी शाहरुखची निवड करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, या सिनेमाच्या निमित्ताने भन्साळींनी शाहरुखची भेटही घेतली आहे. इतकंच नाही तर त्याला सिनेमाची स्क्रिप्टही पाठवली आहे. ही स्क्रिप्ट शाहरुखला आवडल्याचंही म्हटलं जात आहे.