Join us

लग्नानंतर पाच वर्षांनी रुबिना दिलैक गरोदर? अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:19 IST

रुबिना दिलैक प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा, अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक अभिनयाबरोबरच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. ‘छोटी बहू’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या रुबिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘बिग बॉस १४’मध्येही रुबिना सहभागी झाली होती. रुबिना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा रुबिना तिचे व पतीबरोबरचे फोटो शेअर करताना दिसते. सध्या रुबिनाने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओमुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

रुबिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने हाय स्लिट ड्रेस परिधान केल्याचं दिसत आहे. रुबिनाने फोटोशूटचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना रुबिना गरोदर आहे का? असा प्रश्न पडला आहे. रुबिनाच्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. एकाने कमेंट करत “ही गरोदर आहे का?” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “तू गरोदर आहेस का?” अशी कमेंटही केली आहे.

“...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट

“मी महिलेशी लग्न...”, महिला सेक्रेटरीबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांदरम्यान रेखा यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

“छोटा अप्पू किंवा रुबी येतेय...”, असंही एकाने कमेंट करत म्हटलं आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने “रुबिना तू गरोदर आहेस का?” असा प्रश्न विचारला आहे. तर एका नेटकऱ्याने रुबिना आणि तिच्या पतीला कमेंट करत थेट शुभेच्छा दिल्या आहेत. “रुबी आणि अभी अभिनंदन” असं नेटकऱ्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मालिकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलेल्या रुबिनाने अभिनव शुक्लाबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. ते दोघेही ‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी झाले होते. या शोमध्ये त्यांनी घटस्फोट घेण्याचा विचार करत असल्याचा खुलासा केला होता. परंतु, या शोनंतर त्यांच्यातील दुरावा मिटला. अनेकदा ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

 

टॅग्स :टेलिव्हिजनबिग बॉस १४