Join us

ही मराठमोळी अभिनेत्री आहे करोडोची मालकीण, या व्यवसायिकासोबत केले आहे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 4:48 PM

या अभिनेत्रीने अनेक हिट चित्रपट दिले असून गेल्या काही वर्षांत ती खूपच कमी चित्रपटात काम करताना दिसते.

ठळक मुद्देइशाचे लग्न टीमी नारंगसोबत झाले असून तो एक व्यवसायिक आहे. त्याचा हॉटेल बिझनेस असून त्याची संपत्ती प्रचंड आहे. त्या दोघांनी अतिशय साधेपणाने मुंबईत लग्न केले होते.

इशा कोप्पीकरने खल्लास गर्ल म्हणून बॉलिवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इशाने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही हिट चित्रपटांमध्ये काम केले असले तरी ती गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करताना दिसत आहे. तिने गेल्या काही वर्षांत एकही हिट चित्रपट दिला नसला तरी आजच्या बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींइतकीच संपत्ती तिच्याकडे आहे. तिचे लग्न एका व्यवसायिकासोबत झाले असून तिला एक मुलगी देखील आहे.

इशाने मुंबईतील रुईया कॉलेजमधून शिक्षण घेतले असून एक मॉडेल म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. ती तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक जाहिरातींमध्ये झळकली होती. मॉडलिंग करत असताना तिला चंद्रलेखा या दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून तिचा अभिनयप्रवास सुरू झाला.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर इशा बॉलिवूडकडे वळली. तिने फिजा या चित्रपटातील एका आयटम साँगद्वारे बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कंपनी या चित्रपटातील खल्लास या गाण्यामुळे तिला खल्लास गर्ल अशी ओळख मिळवून दिली. तिने पिंजर, दिल का रिश्ता, क्या कूल है हम, डॉन यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने आत्तापर्यंत हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड अशा विविध भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 'एक विवाह ऐसा भी' या चित्रपटात सोनू सुदसोबत ती मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक करण्यात आले होते.

इशाचे लग्न टीमी नारंगसोबत झाले असून तो एक व्यवसायिक आहे. त्याचा हॉटेल बिझनेस असून त्याची संपत्ती प्रचंड आहे. त्या दोघांनी अतिशय साधेपणाने मुंबईत लग्न केले होते. त्यांना रायना ही मुलगी असून तिचा जन्म जुलै 2014 मध्ये झाला. इशाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला तिच्या पतीचे आणि मुलीचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

इशा आता अभिनयासोबतच राजकारणात कार्यरत असून तिने काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. 

टॅग्स :इशा कोप्पीकर