'खल्लास' गर्ल ईशा कोप्पीकर भलेही रूपेरी पडद्यापासून दूर आहे, पण ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहते. जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा ती वेगवेगळ्या विषयांवर आपली मते सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. काही दिवसांपूर्वी तिने जिममध्ये वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती बऱ्या वर्षांनी डान्स करताना बघायला मिळाली.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना ईशाने लिहिले की, हा मॉर्निंग वर्कआउटचा व्हिडीओ आहे. ईशाने सांगितले की, 'मनापासून डान्स करणे हाच तिच्यासाठी बेस्ट कार्डिओ आहे. कारण जेव्हा मी डान्स करत तेव्हा असं वाटतं सारी दुनिया माझीच आहे'.
ईशा कोप्पीकरच्या या डान्स व्हिडीओच्या बॅकग्राउंडला 'नचांगे सारी रात' हे गाणं वाजत आहे. ज्यात ईशा धमाकेदार डान्स करत आहे. नुकतंच ईशाने कास्टिंग काउच आणि नेपोटिज्मच्या मुद्द्यावर आपलं मांडलं होतं. ज्यामुळे ती चर्चेतही आली होती.
ईशाने मीडियासोबत बोलताना सांगितले होते की, 'तुम्ही भलेही नेपोटिज्म म्हणा की फेवरेटिज्म, मला असं वाटतं की, ही बाब आमच्यासारख्या आउटसाइडर्ससाठी नुकसानाची बाब असते. पण प्रत्येक स्टार किडला याचा फायदा होतोच असं नाही'.
कास्टिंग काउटववर ईशा म्हणाली होती की, 'तुम्हाला काय हवं आहे यावर हे अवलंबून आहे. तुम्हाला कास्टिंग काउचच्या माध्यमातून काम करायचं असेल तर करा, अनेक अभिनेत्रींनी केलं आहे आणि मोठ्या उंचीवर पोहोचल्या आहेत. पण तुम्हाला तसं करायचं नसेल तर करू नका'.