Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाऊ शाहिदप्रमाणेच इशानही रंगीला, आतापर्यंत या अभिनेत्रींना केलं डेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 14:43 IST

'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. इशान सुद्धा आपल्या भावाप्रमाणे आपल्या चार्मने आणि खास क्यूटनेसने तरूणींना घायाळ करतो आहे.

मुंबई : 'धडक' या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. इशान सुद्धा आपल्या भावाप्रमाणे आपल्या चार्मने आणि खास क्यूटनेसने तरूणींना घायाळ करतो आहे. शाहिद कपूरची वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबतची अनेक अफेअर्स चांगलीच गाजली. याबाबतीत इशानही आपल्या भावाच्या पावलावर पाऊल देताना दिसतो आहे. कारण इशान इंडस्ट्रीमध्ये पूर्णपणे दाखल होण्यापूर्वीच बॉलिवूड ब्यूटीजला डेट करून बसला आहे. 

सारा अली खान - इशान खट्टर

कोणत्याही बॉलिवूड सिनेमाप्रमाणे या दोघांच्या लव्हस्टोरीचे व्हिलन त्यांची फॅमिली ठरली. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी 'केदारनाथ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात तिचा हिरो सुशांत सिंह राजपूत असणार आहे. इशान आणि सारा काही महिन्यांपूर्वी एकमेकांच्या फारच जवळ होते. पण साराच करिअर नुकतंच होणार असल्याने त्यांच्या फॅमिलीने त्यांना दूर राहण्यास सांगितल आणि दोघे वेगळे झाले.

आएशा कपूर - इशान

आएशा कपूर ही संजय लीला भन्साली यांच्या 'ब्लॅक' या सिनेमात बालकलाकार म्हणून दिसली होती. इशान आणि आएशाची भेट भाऊ शाहिद कपूरच्या पार्टीमध्ये झाली होती. दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. पण नंतर दोघे वेगळे झाले आणि आएशा लंडनच्या एका हॉटेल मॅनेजरला डेट करू लागली.  

जान्हवी कपूर - इशान

ही जोडी केवळ त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसाठीच नाही तर ऑफस्क्रीन केमिस्ट्रीमुळेही चर्चेत आहेत. धडकची घोषणा झाल्यापासून दोघेही वेगळे झालेले दिसत नाहीत. या दोघांचं एकत्र असातानाचं सहज वागणं दोघांमध्ये काहीतरी शिजतंय याकडे इशारा करतं. पण याबाबत दोघांनी अधिकृतपणे काहीही सांगितलं नाहीय. मात्र दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी चर्चा होतीये.

टॅग्स :इशान खट्टरबॉलिवूडधडक चित्रपटजान्हवी कपूरसारा अली खान