बॉलिवूड कपल इशिता दत्ता (Ishita Dutta) आणि वत्सल सेठ(Vatsal Sheth) लग्नाच्या जवळपास ६ वर्षानंतर आपल्या पहिला बाळाचं स्वागत करण्यासाठी तयार आहेत. जेव्हापासून इशिताने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केलीय, तेव्हापासून आपलं वेगवेगळं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलिकडेच इशिता आणि वत्सलने त्यांचं मॅटरनिटी फोटोशूट केलं, ज्यात हे कपल खूपच सुंदर दिसत होते.
इशिता दत्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती तिचा पती वत्सलसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये हे कपल काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये ट्विनिंग करताना दिसत आहे. फोटोशूटसाठी इशिता ब्लॅक बॉडीकॉन-स्लिट गाउनची निवड केली आहे, ज्यामध्ये ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसते आहे. यापूर्वी इशिताने एक मॅटर्निटी फोटोशूट केले होते. ज्यात तिने लॅव्हेंडर रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता.
अलिकडेच इशिता आणि वत्सलनं त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. यादरम्यानचा सुंदर व्हिडीओ अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला होता. इशिताने बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता वत्सल सेठसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नापूर्वी इशिता आणि वत्सल दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाली असून हे कपल आई-वडील होणार आहेत. यामुळेच या बातमीने इशिता आणि वत्सल खूप खूश दिसत आहेत. इशिता ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ताची बहीण आहे. जो 'दृश्यम' आणि 'दृश्यम 2' या दोन्हीमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. इशिता 'दृश्यम' चित्रपटात अजय देवगणच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती.